मत्स्य व्यवसायासाठी शिक्षणाच्या वाटा आणि भविष्यातील संधी

पुणे : अलीकडच्या काळात पारंपारिक शिक्षणाच्या वाटेवर चालण्या ऐवजी करिअची वेगळी वाट निवडण्याकडे तरुणाईचा कल वाढत आहे. सीफूड प्रक्रिया आणि निर्यात कंपन्या, फिशिंग गियर इंडस्ट्रीज, फार्मास्युटिकल कंपन्या, फिश प्रोसेसिंग प्लांट्स, अ‍ॅक्वाकल्चर फार्मर्स, अ‍ॅक्वा हॅचरी या सारख्या क्षेत्रात कुशल मनुष्यबळाची मोठी कमतरता असल्याने मत्स्य व्यवसाय क्षेत्राशी निगडीत शिक्षणाकडे विद्यार्थ्यांचा कल वाढू लागला आहे. या क्षेत्रातील शिक्षणाच्या वाटा आणि भविष्यातील संधी, याबाबत आज आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.

पदवी आणि पदव्यूत्तर शिक्षणातील संधी

राज्य कृषी विद्यापीठ, अ‍ॅनिमल अँड फिशरीज सायन्स युनिव्हर्सिटी आणि फिशरीज युनिव्हर्सिटी अंतर्गत विविध शैक्षणिक अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. तेथे राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील प्रवेश परीक्षेद्वारे बीएफएससी (BFSc) पदवीधर आणि एमएफएससीसाठी (MFSc) विविध विषयांतील पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेता येतो. यात अ‍ॅक्वा कल्चर, फिशरीज रिसोर्स मॅनेजमेंट, क्वाटिक इन्व्हायर्न्मेंटल मॅनेजमेंट, फिश जेनेटिक्स आणि ब्रीडिंग, फिश न्यूट्रिशन आणि फीड टेक्नॉलॉजी, क्वाटिक अ‍ॅनिमल अँड हेल्थ मॅनेजमेंट, फिश बायोटेक्नॉलॉजी, फिश प्रोसेसिंग टेक्नॉलॉजी, फिशिंग टेक्नॉलॉजी आणि इंजिनिअरिंग, फिशरीज इकॉनॉमिक्स, फिशरीज एक्स्टेंशन, फिश फिजिओलॉजी आणि बायोकेमिस्ट्री यासारखे विविध अभ्यासक्रम उपलब्ध आहेत.

सरकारी नोकरीतील संधी

राज्य सरकारच्या मत्स्य व्यवसाय विभागात सहायक मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी, मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी, मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण अधिकारी, मत्स्य व्यवसाय विभाग, महाराष्ट्रातील सहायक मत्स्य व्यवसाय आयुक्त. तसेच महाराष्ट्र राज्य ग्रामीण उपजीविका अभियानातंर्गत राज्य/जिल्हा/तालुका मिशन व्यवस्थापक आणि राज्य ग्रामीण उपजीविका अभियान कार्यक्रमातील इतर पदे भरली जातात. तसेच एआरएस परीक्षेद्वारे भारतीय कृषी संशोधन परिषदेअंतर्गत विविध मत्स्यपालन संस्थांमध्ये वरिष्ठ तांत्रिक अधिकारी पदे भरली जातात.

केंद्र सरकारच्या संस्थांमध्ये संधी

सागरी उत्पादन निर्यात विकास प्राधिकरण (एमपीईडीए), फिशरीज सर्व्हे ऑफ इंडिया (एफएसआय), नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशनोग्राफी (एनआयओ) सारख्या केंद्र सरकारच्या एजन्सीमध्ये तांत्रिक अधिकारी किंवा संशोधन अधिकारी. निर्यात तपासणी संस्था, राष्ट्रीय मत्स्य विकास मंडळ, राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळ यामध्ये देखील मत्सव्यवसाय संबंधित पदे भरली जातात.

Exit mobile version