केळी उत्पादक शेतकऱ्यांना पुढील हंगामासाठी तज्ञांचा हा आहे सल्ला…

जळगाव : राज्यात सर्वाधिक केळीचे उत्पादन जळगाव जिल्ह्यात घेतले जाते. येथील केळीला केवळ राष्ट्रीय पातळीवरच नव्हे तर परदेशातही मोठी मागणी असते. मात्र यंदा निसर्गाच्या लहरीपणामुळे केळी उत्पादक शेतकर्‍यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. सुरुवातीला अवकाळी पाऊस व वादळी वार्‍यानंतर आता कडाक्याच्या थंडीने केळीच्या उत्पादनात घट नोंदवली गेली आहे. शिवाय आता थंडीमुळे केळीची मागणही कमी झाली आहे.

अशा परिस्थितीमुळे येणार्‍या हंगामात केळी लागवडीबाबत शेतकर्‍यांना अनेक प्रश्‍न पडत आहेत. याबाबत आंतरराष्ट्रीय केळीतज्ञ डॉ. के.बी.पाटील यांनी शेतकर्‍यांना मोलाचा सल्ला दिला आहे. शेतकर्‍यांनी टप्प्याटप्प्याने म्हणजेच आता फेब्रुवारी-मार्च मध्ये लागवड केली तर अधिकचा फायदा होणार असल्याचे मत डॉ. के.बी.पाटील यांनी व्यक्त केले आहे.

हे देखील वाचा : शास्त्रशुध्द ठिबक सिंचनाने घ्या केळीचे भरघोस उत्पन्न

शेतकर्‍यांना आजचे नियोजन हे पुढील वर्षी देखील फायद्याचे राहणार या दृष्टीकोनातून विचार करणे गरजेचे आहे. मात्र राज्यात सर्वत्रच शेतकरी हे एकाच वेळी केळीची लागवड करतात. त्यामुळे आजची दराची ही अवस्था झाली आहे. शिवाय वातावरणातील बदलाचा परिणाम थेट केळीच्या बागावर झालेला आहे. ही वेळ येऊ नये म्हणून लागवड दरम्यानचे नियोजन गरजेचे असल्याचे डॉ.पाटील यांनी सांगितले.

Exit mobile version