मुंबई : निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्यांचे प्रत्येक हंगामाला नुकसान होतच असते. कधी अतिवृष्टी तर कधी अवकाळी पाऊस व गारपीटीमुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडी आलेले घास हिरावला जातो. यानंतर पंचनामे व नुकसान भरपाईची मागणी होत असते. आता नुकसानभरपाईसाठी शेतकऱ्यांना पिकाच्या नुकसानीची पूर्वसूचना संबंधित विमा कंपनीकडे सादर कराव्या लागणार आहेत. तरच भरपाईची प्रक्रिया होणार आहे. पिकांचे नुकसान झाल्यापासून अवघ्या ७२ तासांच्या आतमध्ये शेतकऱ्यांना ह्या पूर्वसूचना सादर कराव्या लागणार आहेत. शेतकऱ्यांना वेगवेगळ्या ६ पध्दतीने पूर्वसूचना ह्या सादर करता येणार आहेत. त्याची माहिती आज आपण जाणून घेणार आहोत…..
हे आहेत पूर्वसूचना सादर करण्याचे पर्याय
पहिला मार्ग : स्मार्टफोनचा वापर करणार्या शेतकऱ्यांना केंद्र शासनाच्या क्रॉप इन्शुरन्स अॅपच्या माध्यमातून घरबसल्या झालेल्या नुकसानीची माहिती भरता येणार आहे. यासाठी सर्व शेतकऱ्यांनी आपल्या स्मार्टफोनवर क्रॉप इन्शुरन्स अॅप (Crop Insurance App) डाऊनलोड करुन घेणे आवश्यक आहे.
दुसरा मार्ग : ज्या शेतकऱ्यांकडे स्मार्टफोन नाही त्यांना विमा कंपनीच्या १८०० २६६० ७०० या टोल फ्री क्रमांकावर पूर्वसूचना देता येणार आहे.
तिसरा मार्ग : विमा कंपनीच्या pmfby.gov.in या ई-मेलवर
चौथा मार्ग : विमा कंपनीचे तालुकास्तरीय कार्यालय
पाचवा मार्ग : कृषी विभागाचे मंडल कृषी अधिकारी कार्यालय
सहावा मार्ग : ज्या बँकेत विमा जमा केला ती बँक शाखा