नागपूर : शेळी पालन हा शेतकऱ्यांसाठी सर्वात चांगला शेतीला जोड व्यवसाय आहे. शेतकऱ्याने सुरुवातीला कमी शेळ्या विकत घेवून हि शेळी पालन सुरु केले तरी एकाच वर्षात शेतकरी चांगले पैसे या व्यवसायातुन कमवू शकतो. शेळी पालन हा व्यवसाय आपण सुरु करावा अशी अनेक शेतकऱ्यांची इच्छा असते. परंतू शेळ्या विकत घेण्यासाठी पैसे नसल्यामुळे शेतकरी शेळी पालन हा व्यवसाय सुरु करू शकत नव्हते. मात्र आता महाराष्ट्र सरकारने शेळी पालन हि योजना सुरु केलेली आहे.
या योजने अंतर्गत लाभार्थी शेतकऱ्याला शेळी पालन करण्यासाठी अनुदान दिले जात आहे. योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज भरण्याची प्रक्रीया सुरू करण्यात आली आहे. तुम्हाला या योजनेचा अर्ज भरायचा असेल तर खाली पोकरा योजनेची वेबसाईट लिंक दिली आहे. त्या लिंक वरून तुम्ही शेळी पालन योजनेचा ऑनलाईन अर्ज भरू शकता.
अर्ज भरण्यासाठी लिंक : https://dbt.mahapocra.gov.in/Office/Registration/IndividualRegistrationNew.aspx
- शेळी पालन योजना
- पोकरा योजने अंतर्गत शेळी पालन करण्यासाठी शेतकऱ्यांना अनुदान दिले जात आहे. हि योजना महाराष्ट्र सरकारने सुरु केलेली आहे. पोकरा योजनेसाठी ज्या गावांची सरकारने निवड केलेली आहे, त्याच गावातील शेतकऱ्यांना शेळी पालन योजनेचा लाभ घेता येणार आहे.
- शेळी पालन योजनेसाठी पात्रता
- अर्जदार महाराष्ट्रातील रहिवासी असावा.
- अर्जदाराने अगोदर कधीच या योजनेचा लाभ घेतलेला नसावा.
- लाभार्थी व्यक्तीला शेळी पालन किमान ३ वर्षे करणे आवश्यक आहे.
- एका कुटुंबातील एकाच व्यक्तीला शेळी पालन योजनेचा लाभ घेता येईल.
- लाभार्थी व्यक्तीला किमान ३ शेळ्या व १ बोकड खरेदी करणे आवश्यक आहे.
ऑनलाईन फॉर्म साठी आवश्यक कागदपत्रे :
- स्कॅन केलेला पासपोर्ट साईज फोटो.
- स्वाक्षरी स्कॅन केलेली.
- अर्जदाराचे आधार कार्ड.
- दारिद्र्य रेषेखालील लाभार्थी असेल तर दारिद्र रेषेचे कार्ड.
- राशन कार्ड.
- राशन कार्डवरील सर्व सदस्यांचे आधार नंबर.
- बेरोजगारांसाठी स्वयंरोजगार नोंदणी कार्ड Employment registration number
- एकूण जमिनीचा दाखला.
- बँक पासबुक
खालीलप्रमाणे सादर करा शेळी पालन ऑनलाईन फॉर्म :
- मोबाईल फोनच्या ब्राउजरमधील गुगल सर्च बार मध्ये https://ah.mahabms.com/ हि वेबसाईट सर्च करा.
- मोबाईलच्या स्क्रीनवर पशुसंवर्धन विभाग महाराष्ट्र शासन यांची अधिकृत वेबसाईट ओपन होईल.
- मोबाईल स्क्रीनवर दिसत असलेल्या तीन आडव्या रेषांवर टच करा.
- या ठिकाणी अनेक पर्याय दिसतील. तुम्ही अगोदर नोंदणी केली असेल तर योजनेसाठी अर्ज करा या बटनावर टच करा. तुम्ही नवीन असाल तर अर्जदार नोंदणी या बटनावर टच करा.
- या ठिकाणी आधार कार्ड आणि पासवर्ड टाकून लॉगीन करा. तुम्ही नवीन असाल तर अर्जदार नोंदणी करा या लिंकला टच करून नोंदणी करून घ्या.
शेतकरी बंधुंनो Desktop Site या पर्यायाला टच केल्यानंतर जशी हि वेबसाईट कॉम्प्युटरमध्ये ओपन होते अगदी तसीच वेबसाईट तुमच्या मोबाईल स्क्रीनवर दिसेल. मोबाईल वर्जनमध्ये अर्ज करतांना कदाचित तुम्हाला अडचण येवू शकते परंतु तुम्ही जर Desktop Site या पर्यायाला टच केले तर अगदी आरामशीर तुम्ही हा अर्ज तुमच्या मोबाईलवरून सादर करू शकता. त्यामुळे शेळी पालन योजनेचा ऑनलाईन अर्ज सादर करण्यापूर्वी या साईटचे desktop site वर्जन करून घ्या.
हे देखील वाचा :