राज्यात रबविली जाणार ‘शेळी क्‍लस्टर’ योजना; शेतकर्‍यांना असे आहेत फायदे

Goat cluster scheme

मुंबई : शेतीपुरक व्यवसाय म्हणून अनेक शेतकरी शेळी पालन करतात. मात्र अद्यापही शेळीपालनामुळे शेतकर्‍यांना त्यांचे आर्थिक हित पाहिजे तसे साध्य करता आलेले नाही. कारण यात अनेक अडचणी आहेत. याच दृष्टीने राज्य सरकारने ‘शेळी क्‍लस्टर’ योजनेला मंजूरी दिली आहे.

शेळी पालन प्रशिक्षणापासून शेळीचे दुध, मांसाच्या विक्रीपर्यंत अनेक पदार्थ एकाच छताखाली तयार केली जाणारी अशी ही ‘शेळी क्‍लस्टर’ योजना आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास प्रक्षेत्रात ही योजना राबविण्यात येणार आहे. या योजनेसाठी ७ कोटी ८१ लाखाचा निधीही मंजूर करण्यात आला आहे.

प्रायोगिक तत्त्वावर अमरावती जिल्ह्यातील पोहरा येथे ५० एकर जागेवर शेळी क्‍लस्टर योजना राबवली जात आहे. त्यानंतर नागपूर, पुणे, कोकण, औरंगाबाद आणि नाशिक या विभागांमध्ये ही योजना राबवली जाणार आहे.

असे आहे शेळी क्‍लस्टर

शेळी क्‍लस्टरमध्ये प्रशिक्षण केंद्र व शेतकरी निवासस्थान, ५०० शेळ्या व २५ बोकडांचे मॉडेल शेळी फार्म, दीड एकर जागेवर शेळ्यांकरिता शेड, शेळीच्या दुधापासून पदार्थ प्रक्रिया केंद्र, शेळ्यांचे मांस प्रक्रिया केंद्र, विक्री केंद्रासह १५ एकर क्षेत्रावर वैरण लागवड करणारा हा प्रकल्प असणार आहे. समूह शेळी पालन करण्यासाठी शेतकर्‍यांची उत्पादक कंपनी किंवा फेडरेशन स्थापन करुन त्यांना शेळीपालन प्रशिक्षण, शेळीपालन व्यवसायाकरिता लागणार्‍या सुविधा देणे, अद्ययावत तंत्रज्ञान, निर्यात सुविधा दिल्या जातील.

हे देखील वाचा :

Exit mobile version