शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज; या योजनेला पुन्हा मुदतवाढ

farmer-

प्रतीकात्मक फोटो

पुणे : हमीभाव केंद्रावर शेती मालाची विक्री करण्यासाठी शेतकर्‍यांना नोंदणी करणे गरजेचे असते. ही प्रक्रिया ई-पीक पाहणीतून केली जाते. पण यंदा शेतकर्‍यांनी या अ‍ॅपच्या माध्यमातून पिक नोंदणीकडे दुर्लक्ष केले आहे. ई-पीक पाहणीच्या माध्यमातून शेतकर्‍यांना १५ फेब्रुवारीपर्यंत नोंदणी करणे गरजेचे होते मात्र, नोंदणी अत्यल्प झाल्यामुळे २८ फेब्रुवारीपर्यंत ही मुदत वाढवण्यात आली होती. पण या कालावधीमध्येही शेतकर्‍यांनी दुर्लक्ष केल्याने आता १५ मार्चपर्यंत शेतकर्‍यांना अ‍ॅपच्या माध्यमातून नोंदणी करता येणार आहे.

यंदा रब्बी हंगामातील पिकांची नोंदच ई-पीक पाहणीच्या माध्यमातून झालेली नाही. खरीप हंगामात या मोहिमेची सुरवात झाली होती. प्रथमच याची अंमलबजावणी होत असताना शेतकर्‍यांनी खरीप हंगामात सहभाग नोंदवला होती. राज्यातील तब्बल ८४ लाख शेतकर्‍यांनी यामध्ये सहभाग नोंदवला होता. त्याच प्रमाणे आता रब्बी हंगामातही शेतकरी सहभाग नोंदवतील अशी अपेक्षा होती. पण दोन वेळेस मुदतवाढ देऊनही शेतकर्‍यांची संख्या वाढलेली नाही.

ई-पीक पाहणीचा असा होतो फायदा

ई-पीक पाहणीच्या माध्यमातून शेतकरी उत्पादन घेतलेल्या पिकांची नोंद अ‍ॅपवर करणार आहे. त्यामुळे याची नोंद थेट पिकपेर्‍यावर करता येणार आहे. आता सध्या उभारण्यात आलेल्या हमीभाव खरेदी केंद्रावर हरभर्‍याची नोंदणी करायची असल्यास त्याचा ऑनलाईन पीकपेरा गरजेचा आहे. हा पीकपेरा हा ई-पीक पाहणीच्या माध्यमातून नोंदणी केली तरच निघणार आहे. त्यामुळे ई-पीक पाहणीची अंमलबजावणी केली तर हरभर्‍यासाठी देण्यात आलेल्या हमीभावाचा शेतकर्‍यांना फायदा होणार आहे.

हे देखील वाचा :

Exit mobile version