ठिबक अनुदानाची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांना खुशखबर..

drip-irrigation-thibak-sinchan

पुणे : ठिबकसाठी शेतकर्‍यांना ८० टक्के अनुदान दिले जाते मात्र अनेक शेतकर्‍यांना अद्यापही अनुदानाचा लाभ मिळलेला नाही. मात्र आता केंद्र शासनाकडून २०० कोटी आणि राज्याचा १०० कोटीचा हिस्सा असे ३०० कोटी अनुदानाच्या स्वरुपात शेतकर्‍यांना मिळणार आहेत. यामुळे शेतकर्‍यांना लवकरच अनुदानचा लाभ मिळणार आहे.

आतापर्यंत ठिबकसाठी अनुदान हे ४५ टक्के होते. मात्र गतवर्षी राज्य सरकारने यामध्ये वाढ करुन थेट ८० टक्के अनुदान केले आहे. त्यामुळे शेतकर्‍यांचा सहभाग हा दिवसेंदिवस वाढत आहे. गतवर्षी तब्बल १ लाख ३३ हजार शेतकर्‍यांनी योजनेत सहभाग घेतला. मात्र कोरोनाकाळात अनुदानाची रक्कम अडकून पडली.

पंतप्रधान कृषी सिंचन योजनेतील केंद्राच्या खर्चाचे मापदंड हे १० ते १३ टक्क्यांनी वाढविण्यात आले आहेत. यासह मुख्यमंत्री शास्वत कृषी सिंचन योजनेतून देखील अनुदान उपलब्ध होणार आहे. महाडीबीटीच्या माध्यमातून सर्व प्रणाली पूर्ण केली जात आहे. सर्व प्रक्रिया पूर्ण झाली असल्याने अनुदानाची रक्कम शेतकर्‍यांच्या खात्यामध्ये लवकरच जमा होणार आहे.

हे देखील वाचा :

Exit mobile version