अपघाती मृत्यू झालेल्या शेतकर्‍यांच्या वारसांना मिळते २ लाखांची मदत; ‘असा’ घ्या गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजनेचा लाभ

Gopinath Munde Accident Insurance Scheme

नागपूर : केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून शेतकर्‍यांसाठी राबविल्या जाणार्‍या विविध योजनांपैकी एक योजना म्हणजे, स्व. गोपीनाथ मुंडे अपघात योजना(Gopinath Munde Accident Insurance Scheme) . शेतकर्‍याचा अपघाती मृत्यू झाल्यास त्यांच्या वारसाला २ लाखाची मदत ही राज्य सरकारच्या माध्यमातून केली जाते. गेल्या ७ वर्षापासून ही योजना राबवली जात आहे. राज्यातील सर्व सातबाराधारक शेतकर्‍यांचा विमा हप्ता शासनामार्फत भरण्यात आला असून दोन लाख रुपयांचा विमा उतरविण्यात आला आहे.

अशी मिळवा मदत
अपघात झाल्यानंतर पोलिस पंचनामा, पोस्टमार्टम रिपोर्ट, सातबारा, आठ ‘अ’, ६ क, ६ ड, मृत्यृ प्रमाणपत्र, ज्यांचा अपघात झाला आहे त्या शेतकर्‍याचे वारसा प्रमाणपत्र, वारसा अर्जदार इत्यादी कागदपत्रे ही कृषी विभागात जमा करावी लागतात. कृषी विभाग नियुक्त केलेल्या विमा कंपनीकडे या कागदपत्रांची पूर्तता करतात. त्यानंतर योग्य ती चौकशी होऊन संबंधित शेतकर्‍यास किंवा शेतकरी कुटुंबास विमा रक्कम ही अदा केली जाते.

असे आहे मदतीचे स्वरुप
शेतकर्‍याचा अपघाती मृत्यू किंवा अपघातामुळे दोन डोळे अथवा दोन अवयव निकामी झाले असतील तर दोन लाख रुपये नुकसान भरपाई देण्यात येत आहे. तर अपघातामुळे एक डोळा व एक अवयव निकामी झाल्यास एक लाख रुपये नुकसान भरपाई देण्यात येत आहे.

हे पण वाचा :

Exit mobile version