‘सरकारकडे राजकारण करण्यासाठी वेळ आहे पण शेतकऱ्यांसाठी नाही’, असे का म्हणाले माजीमंत्री?

चंद्रशेखर बावनुकळे

नागपूर : खरीप हंगामात अवकाळी पावसामुळे शेतकर्‍यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या संकटातून सावरत नाही तोच रब्बी हंगामातही अवकाळी पावसाचा शेतकर्‍यांना फटका बसला. विदर्भातील नागपूर, अमरावती, यवतमाळ, वर्धा, भंडारा, गोंदिया, गडचिरोली या जिल्ह्यांना पावसाने झोडपून काढले. मराठवाडा व उत्तर महाराष्ट्रातही शेतकर्‍यांचे नुकसान झाले. यावर प्रतिक्रिया देताना भाजप नेते चंद्रशेखर बावनुकळे यांनी राज्य सरकारवर कडाडून टीका केली आहे.

विदर्भात पावसामुळे शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाले. तुर, हरभरा, भाजीपाला पाण्यात गेला, संत्री, मोसंबी, कापूस पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. मात्र, पंचनामे झाले नाहीत. या सरकारला राजकारण करायला वेळ आहे मात्र, शेतकर्‍यांकरता नाही, असा आरोप बावनकुळे यांनी केला.

मागच्या वेळेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शेतकर्‍यांना बांधावर जाऊन नुकसानभरपाई देऊ असे म्हणाले होते. मात्र, आता बांधही गेला आणि पंचनामेही गेले. तुमच्यात थोडशीही संवेदनशीलता असेल, तर तत्काळ सर्व पालकमंत्री, जिल्हाधिकार्‍यांनी नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी त्यांनी यावेळी केली.

Exit mobile version