नाशिकची द्राक्ष पोहचली नेदरलँड आणि बेल्जिअममध्ये…

नाशिक : अवकाळी पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे निर्माण झालेल्या परस्थितीवर मात करुन निर्यातक्षम द्राक्षांचे उत्पादन करण्याचे शिवधनुष्य नाशिक जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादक शेतकर्‍यांनी लिलया पेललं आहे. नाशिक जिल्ह्यातून नेदरलँड आणि बेल्जिअम या देशामध्ये ७ कंटेनरमधून ८९ मेट्रीक टन द्राक्षांची निर्यात झाली आहे.

द्राक्ष उत्पादनात अग्रेसर असलेल्या नाशिक जिल्ह्यातून दरवर्षी मोठ्या प्रामणात द्राक्षांची निर्यात केली जाते. मात्र यंदा निसर्गाच्या लहरीपणाचा मोठा फटका द्राक्ष उत्पादक शेतकर्‍यांना बसला. दर १५ दिवसांनी होणारा अवकाळी पाऊस, थंडी, गारपीट अशा संकटांना तोड देत शेतकर्‍यांना द्राक्ष बागा जपल्या व जोपासल्या. अगदी सुरुवातीपासून थेट तोडणीपर्यंत अवकाळी पावसाचा धोका असल्याने शेतकर्‍यांच्या मनात कायम धाकधूक होती अखेर निर्यातीला सुरवात झाली आहे.

केंद्र सरकारकडून या आहेत अपेक्षा

सन २०२०-२१ हंगामात तब्बल २ लाख ४६ हजार १०७ मेट्रिक टन द्राक्षांची निर्यात झाली होती. त्यातून २ हजार २९८ कोटी रुपयांहून अधिकचे परकीय चलन देशाला मिळाले होते.

केंद्र सरकारने द्राक्ष निर्यातीसाठी कंटेनरचे वाढलेले भाडे, पॅकिंग मटेरियल, इंधन दरवाढ यामुळे निर्यात खर्चात वाढ झाली आहे. याचा विचार करत केंद्र सरकारने माल वाहतूक भाड्यात पन्नास टक्के अनुदान देण्याची मागणी होत आहे. यासह द्राक्ष निर्यातीसाठी नवनवीन बाजारपेठा शोधण्यासाठी मदत करावी, अशी अपेक्षा द्राक्ष उत्पादकव निर्यातदारांना आहे.

Exit mobile version