हमीभावाने मका खरेदी नोंदणीस सुरवात

banana 1

नाशिक : यंदाच्या खरीप हंगामातील मका हमीभावाने खरेदीसाठी नोंदणी प्रक्रिया सुरू झाली आहे. शेतकऱ्यांना मका विक्रीसाठी कमी त्रास सहन करावा लागावा, यासाठी मका नोंदणी प्रक्रिया वीस दिवस सुरू राहणार आहे. खरीप हंगामातील मका पिकाची नोंद असलेला सातबारा खाते उतारा, लागवडीखालील क्षेत्र, शेतकऱ्यांचे आधार कार्ड झेरॉक्स, आयएफसी कोड असलेल्या बँक पासबुकची झेरॉक्स आदी कागदपत्रे यासाठी आवश्यक आहे.

पीक नोंदणी यासाठी बंधनकारक असणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी शेतातील उभ्या असलेल्या मका पिकाची मोबाईल ॲपद्वारे नोंदणी करावी. सर्व कागदपत्रे नोंदणीसाठी त्वरित कार्यालयात घेऊन यावे, असे आवाहन संघाच्या वतीने करण्यात आले आहे.

सिन्नर तालुक्यातील शेतकऱ्यांनी खरेदी विक्री संघाच्या सिन्नर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात असलेल्या संघाच्या कार्यालयात मका नोंदणी करावी, असे आवाहन खरेदी-विक्री संघाचे मॅनेजर संपत चव्हाण यांनी केले आहे.

खरीप हंगाम 2021-22 साठी केंद्र शासनाने मक्यासाठी 1 हजार 870 रुपये हमीभाव जाहीर केला आहे. यावर्षी नोंदणी प्रक्रिया वेळेवर सुरू करण्याचे आदेश शासनाने दिले आहेत.

हे देखील वाचा :

Exit mobile version