सोयाबीन उत्पादक शेतकाऱ्यांनो हे वाचा अन्यथा होऊ शकते तुमचे नुकसान

परभणी : विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि खानदेश अशा चार प्रादेशिक विभागांमध्ये सोयाबीनचे प्रामुख्याने उत्पादन घेतले जाते. मात्र दरवर्षी भेसळयुक्त बियाण्याच्या शेकडो तक्रारी येतात. परभणी जिल्ह्यातील चार तालुक्यांतील ३५ शेतकऱ्यांनी २०२१ च्या खरीप हंगामात ६२.८८ हेक्टरवर पेरणी केलेल्या सोयाबीनच्या १५२ पिशव्यांमध्ये भेसळयुक्त बियाणे असल्याचे आढळून आले आहे, अशी माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली.

२०२१ च्या खरीप हंगामात पेरणी केलेल्या सोयाबीनमध्ये अन्य वाणांच्या बियाण्याची भेसळ असल्यामुळे नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी चार तालुक्यांतील ३५ शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे केली होती. त्यात जिंतूर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या २२ तक्रारी, परभणी, सेलू तालुक्यातील प्रत्येकी चार आणि पाथरी तालुक्यातील पाच तक्रारींचा समावेश आहे.

कृषी विभाग तसेच कृषी विद्यापीठाच्या पथकाने संबंधित शेतकऱ्यांच्या शेतावर जाऊन सोयाबीन पिकांची पाहणी केली असता एका बियाणे उत्पादक कंपनीच्या सोयाबीनच्या बियाण्यामध्ये अन्य वाणांची ३६ ते ८२ टक्के भेसळ आढळून आली. त्याअनुषंगाने अहवाल कृषी आयुक्तलयाकडे पाठविण्यात आला आहे, असे सूत्रांनी सांगितले. दरम्यान, भेसळ्युक्त बियाण्यामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई तत्काळ अदा करावी, अशी मागणी तक्रारदार शेतकऱ्यांनी केली आहे.

असे राखून ठेवा सोयाबीनचे बियाणे

बियाणे साठवताना घ्यायची काळजी

मार्गदर्शनासाठी येथे साधा संपर्क

अशा प्रकारे बियाणे निर्मिती काढणी व साठवणकीच्या काळात काळजी घेत उगवणशक्ती असलेले बियाणे निश्चितच आपणं घरच्या घरी निर्माण करू शकतो. अडचणी/तक्रारी सोडविण्यासाठी मार्गदर्शनासाठी कृषी विभागाच्या टोल फ्री क्रमांक १८००२३३४००० किंवा जवळच्या तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन अमरावती कृषी विभागाने केले आहे.

Exit mobile version