रब्बी पीकांची काढणी करतांना शेतकऱ्यांनी घ्यावी अशा पध्दतीने काळजी

harvesting-of-crops

नागपूर : रब्बी हंगामातील मुख्य पीक असलेल्या ज्वारी, गहू आणि हरभरा या पिकांच्या काढणीला सुरवात झालेली आहे. शेतकरी हे पीक पिवळे पडले की काढायला सुरवात करतात. मात्र, या पिकांचे दाणे पक्व झाल्यानंतर याची काढणी केली तर भविष्यातील नुकसान टळणार आहे. पक्वतेची अवस्था पिकाच्या कालावधीनुसार येत असते.

यामध्ये ज्वारी ही पेरणीनंतर १३० ते १३५ दिवसानंतर काढणी योग्य होते तर चार महिन्यानंतर ज्वारीचे दाणे पाहून काढणी करता येते. गहू हे देखील चार महिन्याचे पीक आहे. हरभरा मात्र, १०० ते ११० दिवसाचे पीक आहे. हा काढणी कालावधी पूर्ण झाला की पक्वता आलेली असती त्या दरम्यान काढणी कामे केल्याने दाण्यावर परिणाम होणार नसल्याचे कृषीतंज्ञांचे मत आहे.

सोयाबीनची काढणी करताना शेतकर्‍यांनी विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. सोयाबीनच्या शेंगा ९० टक्के पिवळ्या झाल्यावरच काढणी योग्य राहणार आहे. उशिर झाला तर मात्र दाणे गळण्याचा धोका निर्माण होतो. यामुळे शेतकर्‍यांनी विशेष काळजी घेण्याची आवश्यकता आहे.

हे देखील वाचा :

Exit mobile version