पीक पध्दतीतील बदलामुळे कसा होतो शेतकऱ्यांना फायदा? जाणून घ्या

मुंबई : शेतकर्‍यांना पीक पध्दतीत बदल करण्याचा सल्ला सर्वच कृषीतज्ञांकडून दिला जातो. मात्र अजून अनेक शेतकरी पारंपारिक पीकांनाच पसंती देतात. याचा परिणाम त्यांच्या उत्पन्नावर होतांना दिसत आहे. पीक पध्दतीमध्ये बदल न केल्यास उत्पादन वाढविण्यासाठी आणि कीटक आणि रोगांना दूर ठेवण्यासाठी रासायनिक खते आणि कीटकनाशकांचा वापर मोठ्या प्रमाणात करावा लागतो. यामुळे खर्चात वाढ तर होतेच पण शेतजमिनीचे आरोग्यही बिघडते.

पीक पध्दतीमध्ये बदल ही काळाची गरज आहे. यामुळे उत्पादनात तर वाढ होतेच पण शेतजमिनीच्या मातीतील पोषक घटकांमध्ये देखील वाढ होते. यामुळे फेरपिकाचा प्रयोग केल्यास रोग घटक आणि तण रोग घटक याचा सामना करण्यासाठी जमिन ही तत्पर असते.

शेतामध्ये एकच पीक वारंवार घेतले तर उत्पादनात तर घट होतेच पण जे कीड आणि रोगासाठीही पोषक वातावरण तयार होते. शेतीपिकावर कसे आक्रमण करायचे याचे धडेच किटक आणि त्या रोगाला दिले जात असल्याने उत्पादनात घट आणि जमिनीचा पोतही बिघडतो. एका वेळी दोन किंवा तीन पध्दतीने पीकांची लागवड केली तर त्याचा अधिकचा फायदा होतो. यामुळेच शेतकर्‍यांना पीक पध्दतीत बदल करण्याचा सल्ला दिला जातो.

Exit mobile version