आंब्याचा मोहोर वाढवण्यासाठी शेतकऱ्यांनो याकडे लक्ष द्या

how-to-increase-mango-blossom

रत्नागिरी : मध्यंतरीचा अवकाळी पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे आंब्याला मोहोर लागण्याची प्रक्रिया मंदावली होती. आता पुन्हा आंब्याला मोहोर लागण्यासाठी पोषक वातावरण निर्माण झाले आहे. त्याच अनुशंगाने कोकण कृषी विद्यापीठाने फवारणीचे वेळापत्रकच जाहीर केले आहे. यामध्ये फवारणीच्या माध्यमातून किडरोगराईचे व्यवस्थापन शेतकर्‍यांनी केले तर आंब्याला मोहोर लागणार आहे. आता हे पिक अंतिम टप्प्यात असून शेतकऱ्यांनी हा विद्यापीठाचा पंचसुत्री कार्यक्रम राबवला तर आंबा पिकाला नवसंजीवनी मिळणार आहे.

मध्यंतरी अवकाळी पाऊस आणि निर्माण झालेल्या वातावरणामुळे आंब्याला मोहोर लागत नव्हता. आता उशिराने का होईना हवामान पोषक झाले आहे. आंब्याला मोहोर लागण्यासाठी थंड वातावरण आवश्यक असते. आता गत काही दिवसांपासून वातावरणातील गारठा वाढत आहे. तरीही सध्या म्हणावी तशी थंडी नाही. जर थंडीमध्ये खंड पडून उष्णता निर्माण झाली तर मात्र, मोहोरावर किडीचा प्रादुर्भाव वाढण्यास पोषक वातावरण निर्माण होते. किडनियंत्रणाच्या उपाययोजना करणे गरजेचे आहे. यामध्ये गरजेनुसार छाटणी, खतांचा संतुलित वापर, मोहोराचे संरक्षण होईल अशा किटकनाशकांची फवारणी ही गरजेची आहे. अन्यथा मोहोरावर किडीचा प्रादु्र्भाव झाल्यास पुन्हा मोहोर गळतीचा धोका निर्माण होणार आहे. सध्या वातावरण कोरडे असून आंबा उत्पादक शेतकऱ्यांनी योग्य ती काळजी घेतली तर मात्र, झालेले नुकसान भरुन काढण्याची संधी आहे.

कसे करावे लागणार आहे व्यवस्थापन?

गरजेनुसार छाटणी, खतांचा संतुलित वापर, संजीवकांचा वापर, मोहोर संरक्षण आणि फळांचे व्यवस्थापन ही महत्वाची प्रक्रिया आहे. आंब्याच्या कैर्‍या ह्या वटाण्याच्या आकाराच्या झाल्या की, प्रत्येक झाडाला १५० ते २०० लिटर पाणी देणे आवश्यक राहणार आहे. अशाच प्रकारे १५ दिवसांच्या अंतराने अंदाजे ३ ते ४ वेळेस अशाप्रकारे पाणी दिल्यास फळगळ ही कमी फळांचा आकार वाढणार आहे. जर फळधारणा होऊन ७५ दिवस उलटले असतील तर मात्र, पाणी देण्याची आवश्यकता लागणार नाही. आंब्याच्या मोहोराचे संरक्षण करताना तिसर्‍या व सहाव्या फवारणीच्या प्रसंगी युरियाचे मिश्रण करुन फवारणी केल्यास फळाची वाढ ही जोमात होणार आहे.

हे देखील वाचा :

Exit mobile version