सोयाबीनच्या भरघोस उत्पादनासाठी अशा पद्धतीने करा नियोजन

जमीन:

मध्यम पूर्व काळी पोयट्याची चांगली निचरा होणारी.

पूर्वमशागत :

एक नांगरट, दोन कुळवाच्या पाळ्या देऊन जमीन भुसभुशीत करावी.

सुधारित वाण :

जे. एस. ३३५. एम. ए. सी. ११८८, फुले कल्याणी (डी. एस. २२८), जे. एस. १३०५, के. एस. १०३. फुले अग्रणी (केडीएस ३४४) आणि फुले संगम (केडीएस ७२६)

पेरणी व लागवडीचे अंतर :

पेरणी खरीपात जुनच्या पहिल्या पंधरवड्यात वापशावर करावी. भारी जमिनीत पेरणे ४५ से.मी. X ५ से.मी. आणि मध्यम जमिनीत ३० से. मी. X १० सें.मी. अंतरावर करावी.

बियाणे

सलग पेरणीसाठी ७५-८० किलो प्रति हेक्टर तर टोकण करण्यासाठी ४५-५० किलो प्रति हेक्टर बियाणे वापरावे.

बीजप्रक्रिया:

बुरशीजन्य रोगांपासून संरक्षण करण्यासाठी प्रति किलो बियाण्यास ५ ग्रॅम ट्रायकोडर्मा चोळावे. तसेच नत्र स्थिरीकरण्यासाठी सोयाबीन गटाचे रायझोवियम २५० ग्रॅम + स्फुरद विरघळविणारे जिवाणु २५० ग्रॅम प्रति १० किलो बियाण्यास चोळावे.

आतंरपिके :

सोयाविन + तूर (३:१) या प्रामाणात घ्यावे.

खत मात्रा :

भरखते : चांगले कुजलेले शेण खत किंवा कंपोस्ट खत हेक्टरी २५ ते ३० गाड्या वापरावे.

वरखते : सोयाबीन पिकास हेक्टरी ५० किलो नत्र, ७५ किलो स्फुरद आणि ४५ किलो पालाश पेरणीच्या वेळी द्यावे. खते पेरणीपूर्वी जमिनीत मिसळुन द्यावीत. अथवा दोन चाड्याच्या पाभरीने खते व बियाणे एकाचवेळी पेरून द्यावे.

आंतर मशागत :

तणांच्या बंदोबस्तासाठी पेरणीच्या वेळी प्रति हेक्टरी पेंडिमेथॅलीन १.० ते १.५ किलो क्रियाशील घटक ६०० ते ७०० लिटर पाण्यामध्ये मिसळुन जमिनिवर फवारावे, पीक उगवणीनंतर १५ ते २० दिवसांनी एक कोळपणी व नंतर खुरपणी करून शेत तण मुक्त ठेवावे. अथवा पीक उगवणीनंतर २१ दिवसांनी प्रति हेक्टर इमेझेयायपर क्रियाशील घटक ०.१ ते ०. १५ किलो ५०० ते ६०० लिटर पाण्यामध्ये मिसळुन तणांवर फवारावे.

पाणी व्यवस्थापन:

पिकाला फांद्या फुटताना (पेरणीनंतर ३० ते ३५ दिवसानी), फुलोऱ्यात असताना (पेरणीनंतर ४५ ते ५० दिवसांनी) पावसाने ताण दिल्यास पाण्याच्या पाळ्या घ्याव्यात.

काढणी:

सोयाबिनच्या शेंगाचा रंग पिवळट तांबुस झाल्यानंतर, जातीच्या पक्वतेच्या कालावधीनुसार १०० ते ११० दिवसांत काढणी करावी. पीक काढणीस उसीर झाल्यास शेंगा फुटण्यास सुरवात होते.

उत्पादन :

सोयबीन पिकाचे उत्पादन २० ते २५ क्विंटल प्रति हेक्टर मिळते.

रोग :

तांबेरा या बुरशीजन्य रोगामुळे पानांवर तपकिरी रंगाचे ठिपके येतात. व पाने तपकिरी पडतात. आर्द्रतायुक्त हवामान, वारा, , रोपांची जास्त संख्या यामुळे पिकात हवा खेळण्यचे कमी झलेले प्रमाण या बाबी रोगास आंमत्रित करतात. या रोगाने शेंगा पिवळसर तपकिरी पडतात. बऱ्याचवेळा अकाली पानगळ होते. दाण्यांच्या वजनात लक्षणीय घट होते व हेक्टरी उत्पादन घटते. तांबेरा प्रभाविता भागात (सांगली, कोल्हापुर व सातारा) पेरणी शक्यतो १५ ते २५ जुनच्या दरम्याम करावी. फुले अग्रेणीसारखी रोगास बळी न पडणारा वाण वापरावा. प्रोपीकानॅझॉल या बुरशीनाशकाची फवारणी १ लिटर ला १ मिली या प्रमाणात करावी. पिकाच्या अवस्थेनुसार १-२ फवारण्या १५ दिवसाचे अंतराने गरजेनुसार घ्याव्यात.

सोयाबिनपासून मुख्यतः खालील प्रमाणे पदार्थ तयार करता येतात.

सोया दुध निर्मिती

कृती : एक किलो सोयाबीन तीन लिटर पाण्यामध्ये रात्रभर भिजत घालावे. भिजलेले सोयाबीन स्वच्छ आणि वाहत्या मिक्सर ग्राइंडरचे झाकण बंद ठेऊन ग्राइंड करावे. यामध्ये आत गरम पाण्याची वाफ तयार होते. हवाबंद स्थितीमध्ये पाण्याखाली धुऊन घ्यावे. त्यावरील साल काढुन घ्यावे. आपल्या अपेक्षानुसार घट्ट किंवा पातळ दुध तयार करण्यासाठी ६ रे ८ लिटर पाणी उकळुन घ्यावे. हे गरम पाणी मिसळुन मिक्सर च्या साह्याने सोयाबिन पेस्ट तयार करु घ्यावी.ग्राइंडिंगचा परिणाम मिळतो. हि तयार केलेली पेस्ट आधीच गरम केलेल्या ८ लिटर पाण्यामध्ये मिसळत राहावी. संपूर्ण पेस्ट मिसळुन झाल्यानंतर हे मिश्रण २० मिनिटांना उकळावे.

गरम केलेले हे मिश्रण पातळ कापडाच्या साह्यानेगाळुन घ्यावे. गाळल्यानंतर आपल्याला सोय दुध मिळेल. दुधामध्ये विविध स्वाद आणि साखर मिसळुन थंड केल्यास सुगंधी दुध तयार होते. मधुमेही लोकांसाठी साखरेवजी ‘शुगरफ्री टॅबलेटचा वाबर केल्यास तो कॅलरी उत्पादन मिळते. त्याला चांगली किंमत मिळते. गाळुन शिल्लक राहिलेल्या चोथ्याचा वापर खव्यामध्ये मिसळुन विविध मिठाया तयार करण्या करिता करतात. या मिठाया चविला स्वादिष्ट आणि आरोग्यासाठी पौष्ठिक ठरतात.

सोया पनीर निर्मिती

कृती: सोया दुध तयार केल्यानंतर आपण ते उकळतो. लगेच पनीर निर्मिती करतांना ते किंचित थंड (७० अंश सेल्सिअसेपर्यंत) करुण घ्यावे. मात्र, जर सोया दुध थंड असेल, तर गरम करु तापमान ७० अंश सेल्सिअसपर्यंत वाढवावे. तयार झालेल्या सोया दुध फाटुन घेण्यासाठी त्यात कॅक्शियम सल्फेट किंवा मॅग्रेशिअम क्लोराईड किंवा सायट्रिक अॅसिड ०.२% (२ ग्रॅम प्रति लिटर) सावकाश हलवत हलवत मिसळुन घ्यावे. ही रसायने सोया दुधातील प्रथिनांचा साका तयार करण्यास मदत करतात.

सोया दुधापासुन दही किंवा निर्मिती

कृती : सामान्य दुधापासून तयार केलेल्या दह्यापेक्षा सोया दहामध्ये कोलेस्टेरॉल आणि मेंदों प्रमाण कमी असते. दही बनविण्याची पध्दत पारंपरित दही बणविण्यासारखीच आहे. मात्र विरजणातील जिवाणूंच्या वाढिसाठी शर्करेची आवश्यकता असल्याने सोया दुधामध्ये साखर मिसळावी लागते. सामन्यतः एक लिटर सोया दुधामध्ये एक चमचा साखर मिसळुन चांगले हलवून घ्यावे. जाड तळ असलेल्या भांड्यामध्ये हे सोया दूध ५० अंश सेल्सिअस तापमानापर्यंत तापवून घ्यावे. त्यातील एक कप सोया दुध वेगळे घेऊन त्यात विरजन (कल्चर ) चांगले मिसळुन घ्यावे. त्यानंतर हे द्रावण उर्वरित सोया दुधामध्ये हळुहळु मिसळुन चांगले ढवळून घ्यावे. चांगले दही किंवा योगर्ट लागण्यासाठी किंचीत उष्ण वातावरणामध्ये ठेवावे लागते. पहिल्या टप्पामध्ये सोया दुध ३५ ते ४० अंश सेल्सिअस तापमानामध्ये आठ तास ठेवावे. त्यानंतर सोया योगर्ट किमान दोन तास रेफ्रिजरेटरमध्ये ठेवावे, त्यामुळे सोया योगर्ट सेट होण्यासाठी योग्य वेळ मिळतो.

इतर पदार्थ; सोया स्नॅक्स

१. ५०० ग्रॅम सोयाबीन स्वच्छ पाण्यात १२ ते १६ तास भिजत ठेवावे.

२. भिजवलेले सोयाबीन कपड्यात बांधुन उकळक्या पाण्यात ५-१० मिनिटे धरावे.

३. सोयाबीन दाण्यावरील साल काढुन टाकवी.

४. सोललेल्या सोयाबीनला सुकवून सुकलेल्या सोयाबीन दाण्यांना जेवढे चिटकेल तेवढेच पीठ लावावे.

५. चवीनुसार तिखट, मिठ, मसाले, लसुण पेस्ट टाकावी.

६. दाणे सुटे सुटे घ्यावेत. तळलेल्या सोया स्नॅकवर चवीनुसार चॅट मसाला लावावा.

(साभार : राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान सन 2020-21, माहिती पुस्तिका – लागवड व तंत्रज्ञान)

हे देखील वाचा :

Exit mobile version