कृत्रिम खत टंचाई रोखण्यासाठी केंद्र सरकारचा महत्वाचा निर्णय

मुंबई : प्रत्येक हंगामात शेतकऱ्यांना सतावणार्‍या मुख्य प्रश्नांपैकी एक म्हणजे खत टंचाई! ऐन हंगामात होणार्‍या खत टंचाईमुळे शेतकर्‍यांना आर्थिक झळ बसते. परिस्थितीचा फायदा घेत व्यापार्‍यांकडून कृत्रिम टंचाई निर्माण केली जाते. यात शेतकरी भरडला जातो. गेल्या काही दिवसांपूर्वी युरिया टंचाई निर्माण झाली होती. यापार्श्वभूमीवर केंद्रीय खत मंत्रालयाने तब्बल १६ लाख टन युरियाची आयात करण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे कृत्रिम टंचाईला आळा बसणार आहे.

भारतात दरवर्षी २५ लाख टन युरियाचे उत्पादन होते, परंतु देशांतर्गत युरियाची मागणी उत्पादनापेक्षा जास्त आहे, ज्याची पूर्तता करण्यासाठी दरवर्षी ८० ते ९० लाख टन युरिया आयात करावा लागतो. यावर्षी एप्रिल-जुलै या तीन महिन्याच्या कालावधीत चीनकडून सुमारे १० लाख टन युरिया आयात करण्यात आला होता. देशांतर्गत गरजा लक्षात घेऊन चीनने आता निर्यातीवर बंदी घातली आहे. त्यामुळे आता भारताला रशिया आणि इजिप्तमधून युरिया आयात करावा लागत आहे. खते मंत्रालयातील सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पश्चिम किनारपट्टीवरील बंदरात १० लाख टन आयात केलेले खत येईल तर ६ लाख टन पूर्व किनारपट्टीवर येईल. आयात केलेले खत देशात पोहोचून देशांतर्गत बाजारपेठेच्या पुरवठ्यासाठी इंडियन पोटॅश लिमिटेडला देण्यात येणार आहे.

Exit mobile version