शेतकऱ्याच्या गुलाबाला वाढली मागणी

gulab

जालना : व्हॅलेंटाइन डे आणि पाठोपाठ सुरू असलेली लग्नसराई यामुळे सध्या गुलाबाच्या फुलांना मोठी मागणी आहे. निर्यातीपेक्षा स्थानिक बाजारपेठेत दर अधिक मिळत असून, सध्या पुणे, अहमदाबाद, सुरत, भोपाळ, मुंबई, दिल्ली, जयपूर, लुधियाना, आदी शहरांत मोठ्या प्रमाणावर फुले जात आहेत.

परदेशात लाल गुलाबाच्या एका फुलाला 13 ते 14 रुपये दर मिळत आहे. तर स्थानिक बाजारपेठेत लाल गुलाबाच्या एका फुलाला 17 ते 18 रुपये तर गुलाबी, नारंगी, पिवळा, पांढरा आदी रंगाच्या गुलाब फुलाला 20 ते 21 रुपये दर मिळत आहे. व्हेलेंटाईन निमीत्त फुलांना मागणी असली तरी, कोरोनामुळे काही भागात अजूनही बस,एसट्या बंद असल्यानं बाहेरगावी फुले पाठवणे बंद झाली आहेत. फुलविक्रीचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसलाय.

सध्या एस.टीचा संप चालू असल्याने फुलांची निर्यात कमी झाली आहे , पार्सल सेवाही बंद झाली आहे. शेतकऱ्यांना आपली फुले स्थानिक बाजारपेठेतच विक्रीला आणावी लागतायत. स्थानिक बाजारपेठेत फुलांना जास्त मागणी नसल्याने गुलाब,गलांडा,झेंडू,शेवंती सह इतरही फुलांचे भावही पडलेत. शेतात सडण्यापेक्षा बाजारात नेवून काही तरी पैसा हातात येईल या उद्धेशानं शेतकरी येईल त्या भावात विक्री करीत आहेत. मागील दोन वर्षांत करोनामुळे फूल उत्पादक शेतकऱ्यांना बसलेल्या आर्थिक फटक्‍यामुळे उत्पादकांची संख्या 30 ते 35 टक्‍के कमी झाली आहे. हवामानातील बदलामुळे उत्पादनही घटले. त्याचा फुलांच्या वाढीवरही परिणाम झाला आहे.

स्थानिक बाजारपेठेत मागणी व रास्त भाव मिळत असला. तरी, विदेशी व संभाव्य ग्राहक टिकून ठेवण्यासाठी फुलांची निर्यात करावी असा शेतकऱ्यांचा कल असतो. गेल्या वर्षी साधारणपणे २०० रुपये भाव मिळत होता. सोशल मीडियाच्या जमान्यात इमेज तसेच व्हिडीओद्वारे प्रेम व्यक्त करण्याच्या भावना दृढ होत असताना लाल गुलाबासही मागणी आहे. मात्र, ती अपेक्षेपेक्षा कमी आहे. कष्टाच्या तुलनेत भाव कमी मिळतो. त्यातच फवारणी करत जास्त निगा राखावी लागत असल्याने शेतकरी गुलाबाची लागवड कमी प्रमाणात करत आहेत.

हे देखील वाचा :

Exit mobile version