ग्लोबल वॉर्मिंगचा शेतीवर विपरित परिणाम; वाचा आयपीसीसीचा धक्कादायक अहवाल

global warming

मुंबई : गेल्या काही वर्षांमध्ये ग्लोबल वॉर्मिंग हा कमालीचा चिंतेचा व चिंतनावा विषय ठरत आहे. ग्लोबल वॉर्मिंगचा परिणाम केवळ मानवी जीवनावर होणार नसून शेतीवर देखील याचे विपरित परिणाम होणार असल्याचे धक्कादायक संशोधन समोर आले आहे.

आयपीसीसीने (इम्पॅक्ट ऑफ क्‍लायमेट चेंज) एआर ६ डब्ल्यूजीआयआयएसल क्‍लायमेट चेंज २०२२ या नावाने प्रसिद्ध केलेल्या सहाव्या मूल्यांकन अहवालात हवामान बदलाचे शेतीवर कोणते परिणाम होतील, यावर प्रकाश टाकला आहे.
आयपीसीसीच्या अहवालानुसार, ग्लोबल वॉर्मिंगचा भारतात सर्वाधिक मोठा परिणाम होणार असून. पाण्याची पातळी वाढल्याने जमीन पाण्याखाली जाणार आहे. याशिवाय किनारपट्टीच्या भागात पुराचा सामना करावा लागणार असून खारे पाणी शेतात शिरणार आहे. ज्यामुळे शेतीयोग्य जमीन खराब होईल. यामुळे मका आणि इतर पिकांच्या उत्पादनात मोठी घट होणार असल्याचा अंदाज आहे.

या अहवालानुसार, तापमानात तर वाढ होणारच आहे पण थंडी आणि पावसाचे प्रमाणही वाढणार आहे. यामुळे पिकांचे नुकसान होऊन उत्पादनात घट होणार आहे. तापमान असेच वाढत राहिले तर जगभरात पीक उत्पादनात घट होईल. यात सर्वाधिक नुकसान भारतालाच होणार आहे. २०५० पर्यंत तांदूळ, गहू, डाळी आणि धान्याचे उत्पादन ९ टक्क्यांनी कमी होईल. दक्षिण भारतातील मक्याचे उत्पादन १७ टक्क्यांनी घटणार आहे. यामुळे देशभरातील अन्नधान्याचे भाव वाढून याचा परिणाम आर्थिक बाबींवर होणार असल्याचे आपीसीसीच्या अहवालात नमुद करण्यात आले आहे.

हे देखील वाचा :

Exit mobile version