शेतकऱ्यांना मोफत मार्गदर्शन करण्यासाठी हेल्पलाईन; जाणून घ्या कुठे?

मुंबई : शेती व्यवसाय हा प्रचंड बेभवशाचा मानला जावू लागला आहे. कधी निसर्गाच्या लहरीपणामुळे तर कधी सरकारी धोरणांमध्ये भरडला जातो. अशा वेळी त्याला योग्य मार्गदर्शनाची आवश्यकता असते. नेमका हाच धागा धरुन शेतकर्‍यांसाठी एक कॉलसेंटर (Call Center for Farmers) सुरु करण्यात आले आहे. यामाध्यमातून केवळ एका फोनवर शेतकर्‍यांना मोफत मार्गदर्शन उपलब्ध होते. राज्यातील ३० लाख शेतकर्‍यांसाठी एक किसान कॉल सेंटर उभारण्याचा हा अभिनव प्रयोग झारखंड राज्याने (Jharkhand Government Farmer HelpLine) केला आहे.

या कॉलसेंटरच्या माध्यमातून शेतीशी संबंधित समस्यांवर उपाय शोधण्यासाठी शेतकरी फोन करु शकतात. यासाठी एक टोल फ्री नंबर देण्यात आला आहे. सोमवार ते शनिवार सकाळी १० ते संध्याकाळी ५ या वेळेत शेतकर्‍यांना कॉल सेंटर उपलब्ध होणार आहे. स्मार्ट फोन वापरणार्‍या शेतकर्‍यांना व्हॉट्सअ‍ॅप नंबरवर संपर्क साधता येणार आहे. एवढेच नाही तर वेबसाइटच्या माध्यमातून शेतकर्‍यांनाही मदत केली जाणार आहे.

महाराष्ट्रात असा प्रयोग का राबवला जात नाही?

महाराष्ट्रात शेतकरी आत्महत्या ही एक ज्वलंत समस्या आहे. यास कारणे वेगवेगळी असली तरी शेतकर्‍यांना योग्य माहिती न मिळणे हे देखील त्यातील एक प्रमुख कारण आहे. झारखंड सारख्या मागासलेल्या राज्याने त्यांच्या राज्यातील शेतकर्‍यांसाठी इतका अभिनव प्रयोग राबविला आहे तसा महाराष्ट्रासारख्या प्रगतीशिल राज्यात का राबविला जात नाही? हा मुख्य प्रश्‍न आहे. महाराष्ट्राने झारखंडच्या या कॉलसेंटरचा अभ्यास करुन महाराष्ट्रातील शेतकर्‍यांनाही अशी सुविधा उपलब्ध करुन दिल्यास त्याचा शेतकर्‍यांना निश्‍चित फायदा होईल.

Exit mobile version