कापसाप्रमाणे हरभराही शेतकर्‍यांना तारेल; हे आहे प्रमुख कारण

Gram harbhara

पुणे : यंदा राज्यात हरभर्‍याच्या क्षेत्रात मोठी वाढ झाली असल्याने उत्पादनातही भर पडली आहे. नाफेडच्या माध्यमातून कृषी विभागाने तूर आणि हरभर्‍याच्या खरेदीसाठी केंद्र उभारली आहेत. नाफेडच्यावतीने उभारण्यात आलेल्या खरेदी केंद्रावर ५ हजार २३० असा दर ठरवून देण्यात आला आहे. तर दुसरीकडे खुल्या बाजारपेठेत सध्या ४ हजार २०० ते ४ हजार ४ हजार ७०० असा दर आहे. यामुळे जसे कापसाने शेतकर्‍यांना मोठा आधार मिळवून दिला तसाच आधार आता हरभर्‍याच्या माध्यमातून देखील मिळणार आहे.

यंदा हरभर्‍याचे क्षेत्रात मोठी वाढ झाली असल्याने हरभर्‍याचे दर घसरण्याची भीती अनेक शेतकर्‍यांना वाटत होती. मात्र सरकारने जाहीर केलेले हरभर्‍याचा हमीभाव पुन्हा एकदा शेतकर्‍यांच्या मदतीला धावून आला आहे. खरेदी केंद्राच्या माध्यातून राज्यातील ६ लाख ८९ हजार टन हरभर्‍याची खरेदी करण्याचे उद्दीष्ट समोर ठेवण्यात आले आहे. राज्यातील ३३ जिल्ह्यांमध्ये ही खरेदी केंद्र उभारण्यात आलेली आहेत. शिवाय नोंदणीनंतर आता १ मार्चपासून प्रत्यक्ष खरेदीला सुरवात झाली आहे.

खरेदी केंद्रावर ५ हजार २३० असा दर ठरवून देण्यात आला आहे. तर दुसरीकडे खुल्या बाजारपेठेत सध्या ४ हजार २०० ते ४ हजार ४ हजार ७०० असा दर आहे. दरातील तफावत शिवाय उद्या आवक वाढली तर पुन्हा घसरण ही झालीच असती त्यामुळे यंदाचा हरभर्‍याचा हमीभाव शेतकर्‍यांना तारेल असे चित्र आहे

हे देखील वाचा :

Exit mobile version