‘क्यूआर कोड’ने ओळखा ‘ओरिजनल’ महाबळेश्वर स्ट्रॉबेरी

mahabaleshwar-strawberry-qr-code

सातारा : स्ट्रॉबेरी म्हटले की सर्वात आधी डोळ्यासमोर नाव येतं ते महाबळेश्‍वरचे. मात्र आता स्ट्रॉबेरीचे उत्पादन राज्यभर घेतले जावू लागले आहे. मात्र कोणत्याही डोंगराळ भागात उत्पादन घेतलेली स्टॉबेरी महाबळेश्‍वर स्ट्रॉबेरीच्या नावाने विकली जाते. यामुळे ग्राहकांची फसवणूक होते.

यावर आता कृषी पणन मंडळ कोल्हापूर व प्रक्रिया सहाकरी संस्थांकडून तोडगा शोधला आहे. महाबळेश्‍वर येथे उत्पादित होणार्‍या स्ट्रॉबेरीच्या बॉक्सवर क्यूआर कोड प्रणाली सुरु करण्यात आली आहे.

या क्यूआर कोडमुळे स्ट्रॉबेरी कुण्या शेतकर्‍याची आहे? स्ट्रॉबेरी लागवडीचे ठिकाण कोणते? या मधील न्यूट्रीशन व्हॅल्यू, स्ट्रॉबेरीची तोडणी आणि बॉक्स पॅकिंगची पध्दत एवढेच नाही तर या कोडमुळे जर सेंद्रीय पध्दतीची स्ट्रॉबेरीक असेल तर त्यासोबत त्याचे प्रमाणपत्रही या कोडच्या माध्यमातून पाहवयास मिळणार आहे. यामुळे ग्राहकांची फसवणूक टळणार आहे.

कृषी पणन मंडळ कोल्हापूर व श्रीराम फळ प्रक्रिया सहकारी संस्थेकडून ही प्रणाली सुरु करण्यात आली आहे. आतापर्यंत १० शेतकर्‍यांचा सहभाग झाला आहे. मात्र यात जास्तीतजास्त शेतकर्‍यांचा सहभाग वाढविण्याचा प्रयत्न सुरु आहे.

हे देखील वाचा :

Exit mobile version