रेशीम कोष उत्पादनात ‘या’ कारणामुळे महाराष्ट्राची आघाडी; पारंपारिक प्रतिस्पर्धी कर्नाटकलाही टाकले मागे

पुणे : शेती व्यवसायाला पूरक व्यवसाय म्हणून रेशीम उद्योगाची वेगळी ओळख निर्माण होत आहे. यंदा महाराष्ट्रात १५ हजार ७९५ एकरमध्ये तुतीची लागवड करण्यात आली. यामाध्यमातून २ हजार २०५ टन रेशीम कोषचे उत्पादन झाले. रेशीम कोष उत्पादनात महाराष्ट्राने कर्नाटक राज्याला मागे टाकत विक्रमी उत्पादन घेतले आहे. तुतीच्या लागवडीबाबत जनजागृती करण्यापासून उत्पादनाला बाजारपेठ उपलब्ध करुन देण्यासाठी रेशीम संचानलयाने महत्वाची भुमिका पार पाडल्याने शेतकर्‍यांना लाखों रुपयांचे उत्पादन घेता आले आहे.

रेशीम संचालनालयाने सांगितल्याप्रमाणे राज्यात १५ हजार ७९५ एकरामध्ये तुतीची लागवड आहे. त्यापैकी ८ हजार ९२८ एकर तुती ही केवळ औरंगाबाद विभागात आहे. त्यामुळे राज्यातील विक्रमी उत्पादनात मराठवाड्याचे मोठे योगदान आहे. रेशीम संचालनालयाने बीड, जालना यासारख्या जिल्ह्यांमध्ये देखील बाजारपेठ उपलब्ध करुन देण्यात आली आहे. त्यामुळे वाहतूकीचा खर्च टळला असून योग्य दरही मिळत आहे.

हे देखील वाचा : रेशीम शेतीसाठी अनुदान किती आहे? त्यासाठी कसा व कुठे अर्ज करावा?

एका एकरातून अडीच लाखाचे उत्पन्न

व्यवस्थापन योग्य असल्यास वर्षभराच ५ बॅचदेखील शक्य आहेत. शिवाय अंडीपुंज असल्यास २८ दिवसांमध्ये तर अळीच्या वाल्या अवस्थेत असल्यास २२ दिवसांमध्ये एक बॅच ही निघते. त्यानुसार ४५ ते ६० दिवसांमध्ये बॅच ही रिपीटही होते. अशा नियोजनातून एकरी अडीच लाख रुपयांचा परतावा शक्य आहे. सध्या रेशीम कोषाचे दर हे ५५ ते ९०० रुपये किलोंवर आहेत.

Exit mobile version