साखर उत्पादनात महाराष्ट्राची आघाडी, हे आहे मुख्य कारण; वाचा सविस्तर

sugar-production

पुणे : देशात जवळपास ५१६ साखर कारखान्याच्या माध्यमातून मार्चपर्यंत २८३ लाख टन साखरेचे उत्पादन झाले आहे. यंदा ऊसासाठी वातावरण पोषक राहिल्याने साखर उत्पादनात वाढ झाली आहे. गतवर्षी याच महिन्यामध्ये २५९ लाख टन साखरेचे उत्पादन झाले होते. पण वाढत्या क्षेत्राबरोबरच चांगला उताराही मिळालेला आहे. यामध्ये महाराष्ट्राची महत्वाची भूमिका राहिलेली आहे. एकट्या महाराष्ट्रात मार्चपर्यंत १०८ लाख टन साखरेची निर्मिती झालेली आहे.

देशात महाराष्ट्र व उत्तर प्रदेश या दोन राज्यांतच सर्वाधिक साखरेचे उत्पादन घेतले जाते. यंदा हंगाम अंतिम टप्प्यात असतानाही देशातील ४३५ साखर कारखान्यांकडून सध्याही गाळप हे सुरुच आहे. महाराष्ट्रातील १३ साखर कारखान्यांनी हंगाम बंद केला असला तरी देशातील एकूण उत्पादनापैकी १०८ लाख टन साखरेचे उत्पादन हे महाराष्ट्रात झाले आहे. सध्या राज्यात १८४ साखर कारखान्यांच्या माध्यमातून ऊसाचे गाळप सुरु आहे. आगामी आठ दिवसांमध्ये कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील साखर कारखाने पूर्ण बंद होतील असा अंदाज आहे.

पश्चिम महाराष्ट्रातील साखर कारखाने बंद होऊ लागले असले तरी उर्वरीत राज्यात अतिरिक्त ऊसाचा प्रश्न हा कायम आहे. सध्या सोलापूर, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील हंगाम अंतिम टप्प्यात आहे. तर याच विभागातील १३ साखर कारखान्यांची धुराडीही बंद झाली आहे. मात्र, विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर भारतामध्ये ऊस अजूनही फडातच आहे. शिवाय शेतकर्‍यांच्या ऊसाचे गाळप पूर्ण होत नाही तोपर्यंत कारखाने सुरुच ठेवण्याचे आदेश साखर आयुक्त यांनी दिले आहेत. त्यामुळे काही भागातील हंगाम लांबणार असे चित्र आहे.

हे देखील वाचा :

Exit mobile version