साखर उत्पादनात महाराष्ट्राची आघाडी

sugar

पुणे : साखर उत्पादनात यंदा महाराष्ट्राने आघाडी मारली असून, येथील 184 साखर कारखान्यांनी 15 डिसेंबरपर्यंत सर्वाधिक म्हणजे 31.90 लाख टनाचे उत्पादन केले आहे. हंगामा अखेर महाराष्ट्र 110 लाख टनाचे साखर उत्पादन करून यंदा देशात प्रथम क्रमांकावर राहील अशी चिन्हे दिसत आहेत.

देशात यंदाचा साखर हंगाम सुरू झाल्यापासून पहिल्या तिमाहीतच साखर उत्पादनाने शतकी मजल गाठली आहे. ३१ डिसेंबरअखेर देशात ११५ लाख टन साखरेचे उत्पादन झाले. गेल्या वर्षीच्या तुलनेत ४.८१ लाख टन साखर जादा उत्पादन झाले आहे. महाराष्ट्राने डिसेंबरअखेर आपली आघाडी कायम ठेवली असून नजीकचा प्रतिस्पर्धी उत्तर प्रदेशपेक्षा महाराष्ट्रात तब्बल १५ लाख टन साखर जादा उत्पादन झाले आहे. ३१ डिसेंबरअखेर महाराष्ट्रात ४५ लाख टन साखर तयार झाली. उत्तर प्रदेशात ३० लाख टन उत्पादित झाली आहे. 

यंदाच्या हंगामात नोव्हेंबर २०२१ पर्यंत एकूण साखरेची विक्री सुमारे ४७.५० लाख टन होती. सरकारने या कालावधीपर्यंत ४६.५० लाख टनांचा कोटा दिला होता. सरकारने सप्टेंबरच्या साखर विक्रीचा कालावधी ऑक्टोबर पर्यंत वाढवला होता. आता डिसेंबरचा कालावधीही जानेवारीपर्यंत वाढवला आहे. यामुळे एका महिन्याच्या कोट्याची साखर दोन महिन्यापर्यंत विकता येणार आहे.

चांगले पाऊसमान, शास्त्रीय पद्धतीने केलेली उसाची लागवड, संशोधित वाण व हमीदर यामुळे देशातील ऊस लागवडीचे क्षेत्र वाढत आहे. देशभरातील 471 साखर कारखान्यांत  15 डिसेंबर  पर्यंत  820 लाख टन उसाचे गाळप झाले असून त्याचा सरासरी साखर उतारा 9.22 टक्‍क्‍यांपेक्षा अधिक आहे. गेल्यावर्षी 15 डिसेंबर 2020 पर्यंत देशातील 458 साखर कारखान्यांनी 819.57 लाख टन उसाचे गाळप केले होते. त्यातून सरासरी साखर उतारा 9.02 टक्के मिळून जवळपास 74 लाख टन साखरेची निर्मिती झाली होती. म्हणजेच यंदाचा विक्रमी गाळप हंगाम गतवर्षीच्या हंगामापेक्षा सर्वच बाबतीत थोडाफार वरचढच असल्याचे चित्र समोर येत आहे.

यंदा साखरेच्या सरासरी उताऱ्यात उत्तराखंड (Uttarakhand) (10 टक्के), उत्तर प्रदेश (9.40), महाराष्ट्र (9.35), बिहार (Bihar) (9.15) व कर्नाटक (9 टक्के) ही राज्ये अग्रेसर आहेत. त्यानंतर गुजरात (Gujrat) (8.85), पंजाब (Punjab) (8.75), तमिळनाडू (Tamilnadu) (8.50), हरियाणा (Haryana) (8.10) व आंध्र प्रदेश (Andhra Pradesh), तेलंगणा (Telangana) प्रत्येकी आठ टक्के असा क्रमांक येतो. मात्र, अत्युच्च साखर उताऱ्याचा कालावधी नुकताच सुरू झाल्याने हंगामाअखेर सरासरी साखर उताऱ्यात चांगली वाढ दिसण्याचे तज्ज्ञांचे अनुमान आहे.

कोविड (Covid-19) महामारीतही ऊस लागवड व साखर उत्पादन वाढले असून या महामारीच्या काळात घातलेली बंधने शिथिल केल्याचा फायदा साखर उद्योगाला होत आहे. साखरेच्या विक्रीत आणि विक्रीदरात वाढ होताना दिसते. दुसरीकडे, इथेनॉल (Ethanol) प्रकल्प प्रगतिपथावर असून 30 नोव्हेंबरअखेर संपलेल्या वर्ष 2020-21 मध्ये विक्रमी 302.30 कोटी लिटर इथेनॉलचा पुरवठा देशभरातील 275 आसवनी प्रकल्पातून तेल कंपन्यांना झाला असून, त्याद्वारे देशभरात सरासरी 8.1 टक्के मिश्रणाचे प्रमाण गाळले गेले आहे. या एकाच वर्षात इथेनॉल पुरवठ्याच्या माध्यमातून हजार कोटी रुपयांची मिळकत इथेनॉल पुरवठादारांना झाली असूनही देशातील सर्वोत्तम विक्रमी कामगिरी ठरली आहे.

हे देखील वाचा :

Exit mobile version