आंबा निर्यातीसाठी ‘या’ नऊ जिल्ह्यांमध्ये सुविधा केंद्र

mango-export

पुणे : आंबा निर्यातीसाठी अत्यावश्यक असणारी निर्यात प्रक्रिया करण्यासाठी कृषी पणन मंडळाने तयारी सुरू केली आहे. राज्यात आंबा निर्यातीच्या प्रक्रियेसाठी कृषी पणन मंडळाची नऊ निर्यात सुविधा केंद्रे कार्यरत झाली आहेत. त्यात बारामती (पुणे), नाचणे (रत्नागिरी), जामसंडे (सिंधुदुर्ग) तसेच जालना, लातूर, बीड, वाशी येथील केंद्रांचा समावेश आहे.

मंडळाचे कार्यकारी संचालक सुनील पवार म्हणाले की, जे देश आंबा आयात करतात, त्या त्या देशांच्या नियम, अटी व शर्तींनुसार आंब्यावर विविध प्रक्रिया करून निर्यात केली जाते. यासाठी निर्यातीसाठी आंब्यावर प्रामुख्याने विकिरण, व्हेपर हीट ट्रीटमेंट आणि हॉट वॉटर ट्रीटमेंट या प्रक्रिया केल्या जातात.

आंब्याची दरवर्षी सुमारे ५० हजार टन इतकी निर्यात होते. त्यापैकी ३५ ते ४० हजार टन निर्यात फक्त महाराष्ट्रातून होते. हापूस, केशर यांचा मोठा वाटा त्यात असतो. याशिवाय कर्नाटकातून बैंगणपल्ली, उत्तर प्रदेशातून दशहरी, चौसा या आंब्याची निर्यात केली जाते.

हापूस आंब्याला भौगोलिक मानांकन (जीआय) प्राप्त आहे. त्यामुळे अपेडामार्फत हापूसच्या निर्यातीला अधिकाधिक चालना देण्याचा पणन मंडळाचा प्रयत्न आहे. राज्यात निर्यात सुविधांची उपलब्धता असल्याने निर्यातक्षम उत्पादन, निर्यातपूर्व प्रक्रिया, दर्जा याबाबतीत राज्यातील आंबा उच्च स्तरावर आहे.

हे देखील वाचा :

Exit mobile version