मक्याला ‘मर’ रोगापासून ‘असे’ वाचवा

mar-disease-on-maize

जालना: मराठवाड्यातील जालना जिल्ह्यामध्ये यंदा मका पीकांची लागवड मोठ्या प्रमाणात करण्यात आली आहे. विशेषत: भोकरदन आणि जाफराबाद तालुक्यांमध्ये पेरणीचा टक्का हा वाढलेला आहे. असे असले तरी वाढत्या वातावरणामुळे आता मका पिकावर मर आणि कोरडी मूळकूज रोगाचा प्रादुर्भाव वाढत आहे.

असे करा मर रोगाचे नियंत्रण

ज्या जमिन क्षेत्रावर रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे त्या ठिकाणी ५ ट्रायकोडर्मा प्रति हेक्टर १०० किलो शेणखतामध्ये मिसळून वापरावे लागणार आहे. मात्र, याचे प्रमाण वाढले तरी कोणताही विपरीत परिणाम न होता जैविक बुरशी अधिक परिणामकारक ठरते. मर रोगाचा प्रादुर्भाव दिसताच शेतामध्ये आंतरप्रवाही बुरशीनाशक १ टक्का या प्रमाणात फवारावी किंवा ठिबकद्वारेही देता येणार आहे. जसे की कार्बेन्डसीम १० ग्रॅम १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी लागणार आहे.

Exit mobile version