स्ट्रॉबेरीच्या शेतीतून तरुण शेतकऱ्याने केली लाखोंची कमाई

नांदेड : अलिकडे हवामानातील बदलामुळे पारंपारिक पद्धतीने शेती करणे अवघड झाले आहे. त्यामुळे शेतीला जोड व्यवसाय सुरु करण्याच्या उद्देशाने काही प्रगतीशिल शेतकरी धाडसी प्रयोग करतात. जे शेतकरी पारंपारिक मळक्या वाटे व्यतिरिक्त वेगळी वाट निवडणात त्यांना यश मिळतेच… असाचा काहीसा प्रयोग बारड (ता.मुदखेड) येथील बालाजी मारोतीअप्पा उपवार Marutiappa Upawar या तरुण शेतकऱ्याने स्ट्रॉबेरीच्या शेतीच्या Strawberry Farming माध्यमातून केला आहे.

मुदखेड तालुक्यातील युवा व प्रयोगशिल शेतकरी म्हणून बालाजी यांना ओळखले जाते. उच्च शिक्षित असलेले बालाजी त्यांच्या शेतात नव्या प्रयोगांमुळे परिचित आहेत. काही महिन्यांपूर्वी स्ट्रॉबेरी शेतीबाबत त्यांच्या वाचनात आले. स्ट्रॉबेरी शेतीच्या माध्यमातून चांगले उत्पन्न मिळविता येवू शकते, असे त्यांच्या लक्षात आले. मात्र त्यांच्याकडे पूर्ण माहिती नसल्याने त्यांनी महाबळेश्‍वरला जावून स्ट्रॉबेरीच्या शेतीबाबत सविस्तर माहिती घेतली. त्यानंतर गावात येवून स्ट्रॉबेरीची बाग विकसीत करण्याचा निर्णय घेतला.

बालाजीला साडेसात एक्कर शेती आहे. दहा गुंठ्यावर बालाजीने स्ट्रॉबेरीची बाग लावली. महाबळेश्‍वरला जाऊन १२ रुपये प्रमाणे ‘एस. ए.’ जातीची सहा हजार रोपे आणून शास्त्रशुध्द पध्दतीने त्याची लागवड केली. स्ट्रॉबेरीवर किडीचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून गावरान गाईचे दूध, ताक, गावरान अंडी, दशपर्णी अर्क, वेस्ट डी कंपोजर, जीवामृत आदींची फवारणी करत त्यांनी मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले.

अशा पध्दतीने करा स्ट्रॉबेरीची शेती

Exit mobile version