अशी होते बांबू शेतीतून करोडोची कमाई

bamboo

नागपूर : देशातील शेतकऱ्यांच्या आर्थिक विकासासाठी सरकार अनेक योजनांच्या माध्यमातून प्रयत्न करत आहे. नॅशनल बांबू मिशन याच योजनेचा एक भाग आहे. बांबू शेतीच्या माध्यमातून शेतकरी लाखो रुपयांची कमाई करू शकतात. यासाठी सरकारकडून अनुदानही दिले जात असून नॅशनल बांबू मिशनच्या अंतर्गत शेतकऱ्यांना अनुदान दिले जातात.

बांबू शेती करू इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांना सरकारी नर्सरीमधून रोपे उपलब्ध होतात. बांबूच्या देशभरात १३६ जाती उपलब्ध आहेत. वेगवेगळ्या कामासाठी वेगवेगळ्या जातीचे बांबू वापरले जात असून यात १० बांबूच्या जाती अधिक लावल्या जातात. उपयोगानुसार बांबूच्या जातीची निवड करावी लागते. म्हणजेच जर फर्निचरसाठी बांबू हवे आहेत तर त्यासाठी वेगळ्या बांबूच्या रोपांची निवड करावी लागेल.

साधारण चार वर्ष बांबूच्या शेतीला लागतात, चौथ्या वर्षापासून बांबूची तोडणी सुरू होते. बांबूची लागवड दोन झाडांमध्ये तीन – चार मीटर अंतरावर केली जाते. या अंतरात आपण दुसरे पीक घेऊ शकतो.

बांबू शेतीचे इतर फायदे 

बांबूची पाने गुरांना चारा म्हणून दिली जातात. बांबूमुळे पर्यावरणाचे रक्षण होते. माती संवर्धनाचे महत्वाचे काम बांबू शेती करते. तसेच फर्निचरसाठी लागणाऱ्या लाकडासाठी मोठ्या प्रमाणात केल्या जाणाऱ्या वृक्षतोडीलाही आळा घातला जातो.

बांबू शेतीला किती खर्च येतो

तीन वर्षासाठी एका रोपास २४० रुपयांचा खर्च येतो. यात सरकारकडून प्रति रोपासाठी मदत मिळते. उत्तरेकडील पूर्वेच्या भागात शेतकऱ्यांसाठी सरकार ५० टक्के मदत करते. ५० टक्के सरकारी सहभागात ६० टक्के केंद्र आणि ४० टक्के राज्य सरकार मदत करत असते. तर नार्थ – ईस्टमध्ये ६० टक्के सरकार आणि ४० टक्के शेतकऱ्याला खर्च करावा लागतो. ६० टक्के सरकारी पैशात ९० टक्के केंद्र आणि १० टक्के राज्य सरकारचा भाग असतो. याची सविस्तर माहिती जिल्हातील नोडल अधिकाऱ्याकडे मिळेल.

कमाई किती होईल 

एका हेक्टरमध्ये १५०० ते २५०० रोपे लावू शकतो. जर आपण ३ गुणा २.५ मीटरमध्ये रोपांची लागवड केली तर एका हेक्टरमध्ये १५०० रोपांची लागवड होऊ शकते. त्यामुळे दोन रोपांमध्ये दुसरे पिके घेता येते. ४ वर्षानंतर ३ ते ३.५ लाख रुपयांची कमाई होते. तसेच तुमच्या परिसरातील मागणी आणि मार्केटनुसार अधिक फायदा ही होऊ शकतो.
बांबू शेतीमध्ये प्रत्येक वर्षी लागवड करण्याची गरज नसते. कारण बांबूची शेती ही ४० वर्षापर्यंत करता येते. जर आपण ४ बाय ४ च्या अंतरात रोपे लावाली तर त्यात आपण रिकाम्या जागेत दुसरे पीकापासून देखील काही वर्ष चांगली कमाई होते. आणि बांबू शेतीचे उत्पन्न सुरू झाल्यावर ही शाश्वत कमाई सुरू होते.

हे देखील वाचा :

Exit mobile version