मिश्र शेतीचा यशस्वी प्रयोग; ५ एकरामध्ये ९ पीकं अन् लाखोंचे उत्पन्न

mix farming

नांदेड : पारंपारिक पीकं पध्दतीमुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी अनेक प्रगतिशिल शेतकरी मिश्र शेतीचा प्रयोग करु लागले आहेत. त्यातही काही तरुण धाडसी प्रयोग करत लाखोंचे उत्पादन घेण्यात यशस्वी देखील होत आहेत. अशापैकी एक तरुण शेतकरी म्हणजे नांदेड जिल्ह्यातील हानेगाव येथील रवींद्र घुळे! रवींद्र यांनी ५ एकरामध्ये त्यांनी वेगवेगळी ९ पिकांची यशस्वी लागवड केली आहे.

मिश्र शेतीचा यशस्वी प्रयोग रवींद्र घुळे यांनी केला आहे. त्यांनी या ९ एकरामधील ५ एकरामध्ये झेंडूची लागवड केली आहे तर इतर क्षेत्रावर शेवगा, सीताफळ, लिंबू पिकाची लागवड केली आहे. एवढेच नाही तर उर्वरीत क्षेत्रात त्यांनी भाजीपाल्याची लागवड केली आहे. हे करीत असताना रब्बी किंवा खरीप हंगामातील एकाही पिकाला त्यांनी शेतजमिनीत स्थान दिलेले नाही. हा प्रयोग करण्यापूर्वीच लागवडीपासून काढणी पर्यंतचे त्यांनी नियोजन केले होते. त्यामुळे या अनोख्या प्रयोगातून २ लाखाचे उत्पन्न मिळेल असा दावा या शेतकर्‍याने केला आहे.

सध्या शेवग्याचे दर वाढलेले आहेत. १२० रुपये प्रमाणे किलो असा दर शेवग्याला मिळालेला आहे तर फुंलानाही चांगला दर आहे. त्यामुळे अपेक्षापेक्षा अधिकचे उत्पन्न मिळेल असा विश्‍वास त्यांना आहे. मिश्र शेतीतून उत्पादन तर वाढतेच पण शेत जमिनीचा पोतही सुधारत आहे.

हे देखील वाचा :

Exit mobile version