मोहरीचे दर घटणार; जाणून घ्या कारण

mohari

पुणे : उत्तरेकडील राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात मोहरीचे उत्पादन झाल्याने फोडणीत वापरली जाणारी मोहरी यंदा स्वस्त होणार आहे. गेल्या हंगामात असलेला ८० रुपये किलोचा दर आता ५५ रुपयांपर्यंत घसरण्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. मोहरीची सर्वाधिक लागवड उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, पंजाब, बिहार आणि गुजरातमध्ये होते. यंदा उत्तरेकडील राज्यांमधील शेतकऱ्यांनी मोहरीची मोठ्या प्रमाणावर लागवड केल्याने लागवडीखालील क्षेत्र अडीच ते तीन पटींनी वाढले आहे. मोहरीचे उत्पादन वाढल्याने दरातही मोठी घट होण्याची शक्यता आहे.

उत्तरेकडील राज्यांत मोहरीचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेण्यात येत आहे. व्यापाऱ्यांनी जानेवारी महिन्यात मोहरीच्या निर्यातीचे सौदे सुरू केले असून, सध्या ५५ रुपये प्रतिकिलो दराने सौदे सुरू आहेत. उत्तर प्रदेश, बिहार, पंजाब, राजस्थान या राज्यात मोहरीच्या तेलाचा वापर खाद्यपदार्थांसाठी केला जातो. त्या तुलनेत अन्य राज्यांमध्ये शेंगदाणे आणि सूर्यफुलापासून तयार केलेल्या तेलाचा वापर केला जातो. उत्तरेकडील वातावरण थंड आहे. मोहरी उष्ण असल्याने उत्तरेकडील राज्यांत मोहरीच्या तेलाचा वापर अधिक केला जातो. मोहरीचा हंगाम १५ फेब्रुवारीनंतर सुरू होतो. गुजरातमधील अहमदाबादपासून जवळ असलेले उंजा हे शहर मोहरी विक्रीचे प्रमुख केंद्र आहे. तेथील व्यापारी जिरे, मोहरीची खरेदी करतात. तेथून देशभरात मोहरी विक्रीला पाठविली जाते. उत्तर भारतातील मोहरीला युरोप, आखाती देश; तसेच पोलंडमधूव मोठी मागणी असते. पोलंडमध्ये पिवळ्या मोहरीपासून बटरची निर्मिती केली जाते. मोहरी उष्ण असल्याने युरोपीयन देशातून दर वर्षी मोठी मागणी असते.

हेक्टरी 20 क्विंटलचे उत्पादन

ऑक्टोंबर महिन्यातच मोहरीची लागवड ही केली जाते. लागवडीपूर्वी पुर्वमशागत ही महत्वाची आहे. पुसा मोहरी ही पेरणी केल्यापासून अवघ्या 105-110 दिवसांमध्ये काढणी योग्य होते. योग्य प्रकारे या पिकाची देखभाल केली तर हेक्टरी 18 ते 20 क्विंटल उत्पन्न मिळते. शेतीत शेतकऱ्यांनी वैज्ञानिक तंत्राचा वापर केल्यास उत्पन्न नक्कीच जास्त मिळणार आहे. रोगराई आणि किटकांपासून बचाव करणे हाच यामधला महत्वाचा घटक आहे.

जानेवारीमध्ये मोहरीची काढणी

मोहरी हे पीक 105 ते 110 दिवसांचे पीक आहे. योग्य जोपासणी केल्यास या काळात ते काढणीला येते. हेक्टरी 18 ते 20 क्विंटल उत्पन्न मिळते. १५ सप्टेंबरच्या सुमारास पेरले होणाऱ्या या पिकाची काढणी ही जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यंत केली जाते.

हे देखील वाचा

Exit mobile version