‘या’ माजी पंतप्रधानांच्या वाढदिवसाला साजारा केला जातो ‘राष्ट्रीय शेतकरी दिवस’

मुंबई : भारतात २३ डिसेंबरला देशभरात ‘राष्ट्रीय शेतकरी दिवस’ साजरा केला जातो. कृषीप्रधान देश म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भारतात नेमका २३ डिसेंबरलाच शेतकरी दिवस का साजरा केला जातो, हे आपणास माहित आहे का? तर चला मग आज जाणून घेवूया….

भारताचे पाचवे पंतप्रधान चौधरी चरण सिंह यांचा वाढदिवस (२३ डिसेंबर) राष्ट्रीय शेतकरी दिवस म्हणून साजरा केला जातो. शेतकऱ्यांचे नेते म्हणून ओळखले जाणारे चौधरी चरण सिंह यांनी शेतकऱ्यांचं आयुष्य आणि परिस्थिती सुधारण्यासाठी अनेक धोरणांची सुरुवात केली होती. त्यांच्या या योगदानासाठी तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी २००१ पासून चौधरी चरण सिंह यांच्या सन्मानार्थ दरवर्षी २३ डिसेंबर हा दिवस शेतकरी दिवस म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला.

हे देखील वाचा :

चौधरी चरण सिंह यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्रीपद भूषवले होते. यादरम्यान चौधरी चरण सिंह यांनी अनेक महत्त्वाची कामे केली. त्यांनी तयार केलेला जमीनदारी उन्मुलन विधेयकराज्याच्या कल्याणकारी सिद्धांतावर आधारित होता. यामुळे उत्तर प्रदेशात एक जुलै १९५२ पासून जमीनदारीची प्रथा संपली. याचबरोबर, शेतकर्‍यांच्या हितासाठी त्यांनी लेखापद पद बनवले. त्यानंतर ते उपपंतप्रधान बनले आणि मग पंतप्रधानपदी विराजमान झाले. चौधरी चरण सिंह हे २८ जुलै १९७९ पासून १४ जानेवारी १९८० पर्यंत देशाचे पंतप्रधान होते. देशातील शेतकऱ्यांच्या हितासाठी चौधरी चरण सिंह यांनी भरीव कामगिरी केली आहे. चरण सिंह यांनी राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँकेची (नाबार्ड) स्थापना केली.

चौधरी चरण सिंहांवर होता गांधीजींचा प्रभाव

चौधरी चरण सिंह यांचा जन्म २३ डिसेंबर १९०२ रोजी उत्तर प्रदेशातील हापूडमध्ये झाला होता. त्यांच्या वडिलांचं नाव चौधरी मीर सिंह होतं. चौधरी चरण सिंह लहान असतानाच त्यांचं कुटुंब जानी परिसरात स्थायिक झालं. त्यांनी आग्रा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं होतं. यानंतर गाझियाबादमध्ये काही काळ वकिली केली होती. महात्मा गांधींजींचा त्यांच्यावर प्रभाव होता.

Exit mobile version