साेलापूरात डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांसमोर नवे संकट; वाचा सविस्तर

सोलापूर : डाळिंब उत्पादनात राज्यात अग्रेसर असलेल्या सोलापूर जिल्ह्यात यंदा डाळिंबाचे भरघोस उत्पादन झाले असताना दुसरीकडे मालाचे दर कोसळल्याने डाळिंब उत्पादक शेतकरी अस्वस्थ झाला आहे. सोलापुरातील उत्कृष्ट प्रतीच्या डाळिंबाला नवी दिल्लीच्या बाजारपेठेवर अवलंबीन राहावे लागते. परंतु अलीकडे दिल्लीत वाढलेल्या धुक्यासह एकूणच प्रदूषणामुळे तेथे डाळिंब पोहोचणे कठीण झाले आहे. त्यातच तेल्या रोगाचाही प्रादूर्भाव वाढल्याने डाळिंबाच्या दराची घसरण झाल्याचे सांगितले जाते.

सोलापूर जिल्ह्यात सांगोल्याचे डाळिंब जगात प्रसिद्ध आहेत. एकेकाळी दुष्काळग्रस्त व कोरडवाहू सांगोल्यात शासनाने फलोत्पदानाला चालना दिल्यामुळे या भागात डाळिंब उत्पादन वाढले आहे. त्या खालोखाल पंढरपूर, मंगळवेढा, मोहोळ या भागात डाळिंबाचे उत्पादन घेतले जाते. सोलापूर जिल्ह्यातील एकूण डाळिंबाचे क्षेत्र सुमारे ५४ हजार एकर असून त्यापैकी सुमारे २० हजार एकर क्षेत्र सांगोल्यातील आहे. येथील भगवा व गणेश जातीच्या डाळिंबाला देशासह परदेशातही मागणी आहे. नवी दिल्लीसह राजस्थानातील बाजारपेठेतही येथील डाळिंब पाठविला जातो.

तेथील व्यापारी सांगोल्यात येऊन डाळिंब खरेदी करतात. त्यात चार पैसे जास्त मिळतात. परंतु अलीकडे नवी दिल्लीसाठी डाळिंबाची वाहतूक जवळपास थांबली किवा बऱ्याच अंशी रोडावली आहे. त्यामुळे डाळिंबाला मिळणाऱ्या दराची खात्री संपुष्टात आली आहे. तर दुसरीकडे गुजरातेतूनही डाळिंबाचे उत्पादन वाढल्याने त्याचाही परिणाम सोलापूरच्या डाळिंब दरावर झाला आहे. 

राज्यात चौथ्या स्थानावर असलेल्या सोलापूर कृषिउत्पन्न बाजार समितीकडे मध्यम व कमी प्रतीचे डाळिंब येत असून मागील आठवड्यात एक टन डाळींबाची आवक झाली. डाळींबाला प्रति क्विंटल किमान १ हजार रुपये, सरासरी ४ हजार रुपये आणि सर्वा िधक १२ हजार रुपये असा दर िमळाला. गेल्या पाच सहा दिवसांच्या तुलनेत  डाळिंबाची आवक आा िण दराचा विचार करता त्यात फारसा चढ उतार झालेला नाही. सोलापुरात स्थानिक डाळिंबासह पुणे, नगर, नाशिक, सांगली, लातूर, बीड आदी भागातून डाळिंबाची आयात होते. तर सोलापुरात खरेदी केलेल्या डाळिंबाची निर्यात दक्षिणेकडे आंध्र, तेलगंणा, तामिळनाडूसह कोलकाता, ओरिसा आदी दूर दूरच्या भागात होते.

Exit mobile version