६१ वर्षानंतर कांद्याचा नवा विक्रम; सोलापूर बाजार समितीत काय घडले?

सोलापूर: महाराष्ट्रातील कांद्याची सर्वात मोठी बाजारपेठेचा मान लासलगाव बाजार समितीकडे आहे. मात्र भारतातील सर्वाधिक कांदा आवक होण्याचा विक्रम सोलापूर बाजार समितीच्या नावावर नोंदवल्याचा दावा करण्यात आला आहे.

सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या इतिहासामध्ये स्थापनेपासून आजपर्यंत पहिल्यांदाच १२०० कांदा गाड्यांची आवक झाली आहे. बाजार समितीमध्ये झालेल्या विक्रमी आवकीमुळे आजची एका दिवसात १६ कोटींच्या वर उलाढाल झाली आहे.

सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीची स्थापना १९६१ मध्ये करण्यात आली होती. बाजार समितीच्या स्थापनेपासून एवढ्या मोठ्या प्रमाणावर कांदा आवक पहिल्यांदा झाली आहे.

बाजार समितीत कांदा मोठ्या प्रमाणात आला असला तरी कांद्याचे दर मात्र स्थिर होते. जास्त कांदा आवक झाल्याने कांदा बाजार पडू नये या साठी बाजार समिती मागील वेळे प्रमाणे व्यापार्‍यांनी कांदा व्यवहार बंद ठेवले होते.

Exit mobile version