युरीया खतासाठी अशी होतेय शेतकऱ्यांची अडवणूक; सरकार लक्ष देणार का?

काेल्हापूर  : कोल्हापूर  जिल्ह्यातील शेतकरी सध्या रब्बी हंगामातील पिकांच्या जोमदार वाढीसाठी खतांची योग्य मात्रा देण्यासाठी खत खरेदी करताना नजरेस पडत आहेत. मात्र अशातच कोल्हापूर जिल्ह्यातून खत कंपन्यांची दडपशाही समोर आली आहे, खत कंपन्यांनी एक अजिबो गरिब फर्मान काढून सुफला घेतला तरच युरिया मिळणार अशी सक्ती शेतकऱ्यांवर लाददण्यास प्रारंभ केला आहे. एका  युरियाच्या गोणीसाठी शेतकऱ्यांना १४०० रुपये किमतीचा सुफला विकत घेण्यासाठी जोर जबरदस्ती जिल्ह्यात केली जात असल्याचे शेतकऱ्यांनी सांगीतले.

काही वर्षांपासून बळीराजा अनेक नैसर्गिक संकटांना सामोरे जात आहे; नैसर्गिक संकटे कमी आहेत की काय म्हणून आता सुलतानी दडपशाही देखील सुरू झाली आहे. सुलतानी दडपशाहीचा कोल्हापूर जिल्ह्यात मोठा प्रत्यय समोर आला आहे. खरीप हंगामात झालेल्या मोठ्या नुकसानीमुळे शेतकरी राजा पुरता मेटाकुटीला आला असताना रब्बी हंगामात देखील शेतकऱ्याच्या उंबरठ्यावर नाना प्रकारची संकटे येऊन उभी ठाकली आहेत. रब्बी हंगामात झालेल्या अवकाळी पावसामुळे वाढीसाठी तयार झालेल्या पिकांना मोठा फटका बसला आहे; बळीराजा कसाबसा नाना प्रकारची महागडी औषधी फवारून पिकांना नवीन संजीवनी देण्याचे कार्य करत आहेत.

खत विक्रेत्यांना आरसीएफ कंपनी युरिया हवा असेल तर सुफला हा घ्यावाच लागेल असे सांगून ७० हजार ७०० रुपयांचा युरियाच्या गाडीसाठी खत विक्रेत्यांना ३ लाख ५१ हजार ६०० रुपयांचा सुफला देखील खरेदी करण्याची बळजबरी करत आहेत. केंद्र सरकारने खत कंपन्यांना दर ठरविण्याचे अधिकार दिल्यापासून केंद्र तसेच राज्य सरकार खतांच्या वाढत्या दरांबाबत अंग काढताना दिसत आहे. दर ठरविण्याचे अधिकार मिळाल्यापासून खत कंपन्यांनी दरवाढीचा जणूकाही सपाटा सुरू केला आहे.

खत कंपन्या दरवाढीबाबत दिलेली स्वायत्ततेचा गैरवापर करीत अवाजवी दर शेतकऱ्यांच्या माथी मारताना दिसत आहे. खतांची दरवाढ करून देखील खत कंपन्यांचे समाधान होत नसल्याने त्यांनी आता बळीराजाची पिळवणूक करण्यासाठी एक वेगळीच शक्कल शोधून काढली आहे. खत कंपन्या आता शेतकऱ्यांच्या आवाक्यात असणाऱ्या एकमेव युरिया खतासोबत सुफला खताची अनावश्यक खरेदी करण्याची बळजबरी करू लागले आहेत. आरसीएफ कंपनीच्या युरिया घेण्यासाठी सुफला घ्यावाच लागेल या सक्तीच्या लिंकिंग मुळे इतर कंपनी देखील खतांसाठी लिंकिंग करत असल्याच्या तक्रारी आता समोर येऊ लागल्या आहेत.

Exit mobile version