देशातील साखर उत्पादनात निम्मे वाटा केवळ दोन राज्यांचा, जाणून घ्या महाराष्ट्राचा वाटा

पुणे : साखर उत्पादनात सुरवातीपासूनच महाराष्ट्राचा मोठा आहे. यंदा देशात साखरेचे उत्पादन हे १५० लाख टनावर झालेले असले असून एकट्या महाराष्ट्रातून आतापर्यंत ५८ लाख टन साखरेचे उत्पन्न झाले आहे. तर दुसरीकडे उत्तर प्रदेशातून ४० लाख म्हणजे एकूण उत्पादनाच्या निम्मे उत्पादन हे केवळ या दोन राज्यांमधून झालेले आहे.

गेल्या तीन महिन्यांच्या कालावधीत गाळपातून देशात १५० लाख टन साखरेचे उत्पादन झाले आहे. गेल्या हंगामाच्या तुलनेत यामध्ये १० लाखाने वाढ झाली आहे. तर आतापर्यंत १७ लाख टन साखरेची निर्यात झाली आहे. या सबंध साखर उद्योगामध्ये महाराष्ट्र राज्याची महत्वाची भूमिका राहिलेली आहे. कारण एकूण साखरेच्या उत्पादनापैकी ५८ लाख टन साखरेचे उत्पन्न एकट्या महाराष्ट्रातून झालेले आहे.

यंदा साखर उद्योगासाठी सर्वकाही पोषक आहे. कारण गतवर्षीच्या तुलनेत ४ लाख टन साखर अधिकची निर्यात झाली आहे. मात्र, गेल्या महिन्यापासून आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत साखरेचे दर कमी झाल्याने करारही मंदावले आहेत. मात्र, हीच परस्थिती भविष्यात दर वाढतील अन् यंदा देशभरातून विक्रमी निर्यात होणार आहे.

गाळप हंगाम सुरु झाले की पहिल्या दोन महिन्यांमध्येच साखर निर्यातीचे झालेले करार साखर कारखान्यांसाठी फायदेशीर ठरत आहेत. या करारामुळेच आतापर्यंत १७ लाख टन साखर ही निर्यात झाली आहे. तर जानेवारीपर्यंत ७ लाख टन साखर निर्यात होईल अशी शक्यता आहे.

Exit mobile version