महाराष्ट्रातच दरवर्षी १५०० कोटी रुपयांचा संत्रा व्यवसाय; वाचा संत्रा लागवडीबाबत A टू Z माहिती

भारताचा जगामध्ये लिंबूवर्गीय फळांच्या उत्पादनात चौथा क्रमांक लागतो आणि कागदी लिंबू उत्पादनात प्रथम क्रमांक लागतो. भारतात १० लाख हेक्टर जमिनीवर १०० लाख टन लिंबूर्गीय फळांचे उत्पादन होते. कागदी लिंबू हे लिंबूर्गीय फळांमधील महत्वाचे नगदी पीक असून देशाच्या बहुतेक सर्व राज्यांमध्ये घेतले जाते. लिंबूर्गीय फळपिके ही देशामध्ये महत्वाची असून लाखो लोकांना यापासून रोजगार आणि उपजीविका उपलब्ध होते. एका सर्वेक्षणानुसार दरवर्षी दहा हजार कोटी रुपयाचा व्यवसाय या पिंकापासून होतो. फक्त महाराष्ट्रातच दरवर्षी १५०० कोटी रुपयांचा संत्रा व्यवसाय होतो. ज्यामध्ये नागपुरी संत्र्याचा वाटा सर्वाधिक आहे.

लिंबूवर्गीय फळपिके उत्पादनात केंद्रीय लिंबूवर्गीय फळ संशोधन संस्था, नागपूर या संस्थेचे कार्य मोठे आहे. या संस्थेचे उद्देश या लिंबूर्गीय फळांची उत्पादकता वाढविण्यासाठी मूलभूत आणि व्यवहारीक संशोधन करून तंत्रज्ञान विकसीत करणे. या लिंबूर्गीय फळांची आणि संबंधित वनस्पतींची जैवविविधता जपणे व संबंधित सर्व साहित्याचे संग्रहालय म्हणून कार्य करणे. या लिंबूर्गीय फळांचे स्थानिक बाजारपेठेत आणि निर्यातीतील योगदान लक्षात घेऊन साठवणुकीतील आयुष्य वाढविण्याचे तंत्रज्ञान तयार करण्यासाठी संशोधन करणे आदि कार्य संस्थेकडून केले जातात.

लिंबाच्या रोगांमध्ये खेऱ्या हा रोग मोठ्या प्रमाणावर संपूर्ण देशात पसरला आहे आणि रासायनिक उपाय हाच एक मार्ग याच्या निर्बधासाठी उपलब्ध आहे. यासाठी खेऱ्या रोग प्रतिरोधक वाणाची निर्मिती महत्वाची आहे. वाणांची निर्मिती लिंबूवर्गीय फळांमध्ये बीजविरहीत वाणांची मागणी अधिक आहे यादृष्टीने या संस्थेमध्ये विविध संशोधन केले जात आहे. संत्राचे एन.आर.सी.सी. नागपूर बीजविरहित संत्रा-४ हे वाण यासाठी प्रसारित केले गेले. अशाचप्रकारे याप्रकारचे आणखी संशोधन कार्य संस्थेमध्ये सुरू आहे.

खुट सध्या लिंबुवर्गीय फळांमध्ये ग्राफिंटगसाठी खुट (रूटस्टॉक) म्हणून जंभेरी आणि रंगपुर लाइम यांचा उपयोग संपूर्ण देशामध्ये केला जात आहे. परंतु डिक्या रोगासाठी हे दोनही खुट प्रतिरोधक नसल्यामुळे संस्थेने सध्या एलिमो या खुटाची शिफारस केली आहे. एलिमो हा खुट डिक्यारोगासाठी असल्यामुळे याचे व्यावसायिक लागवडीसाठी रोपवाटिकाधारकांना वितरण केले गेले आहे. तरीसुद्धा वेगवेगळ्या प्रदेशांमध्ये जैविक आणि अजैविक ताण लक्षात घेता वेगवेगळ्या प्रतीचे खुट विकसित करण्याचे संशोधन कार्य सुरू आहे. यामध्ये कॅरीझो, सी-३५ सीटूंज, व्होलकामेयर आणि काही संकर खुटांचे रोग, कीड, क्षारयुक्त जमीन यांच्या प्रतिरोधासाठी परीक्षण केले जात आहे. या परिक्षणामध्ये उत्पादनासोबतच झाडाची वाढ, फळांचे विविध गुणधर्म इत्यादीची माहिती घेतली जाते. प्रगत लिंबुवर्गीय फळ उत्पादन तंत्रासाठी कमी उंची असलेले, किमान सिंचनाची आवश्यकता असणारे खुट तयार करण्याचे कार्य प्रगतिपथावर आहे.

लागवड पद्धती ठिबक सिंचन आणि त्यामार्फत खताचे नियोजनङ्कीही काळाची गरज आहे. सिंचनावर घेणे आवश्यक झाले आहे. यामुळे डोंगराळ भागात आणि हलक्या जमिनीत लिंबुवर्गीय फलोत्पादन घेतले जाऊ शकते व यामुळे क्षेत्र विस्तार होऊ शकतो. या तंत्रामुळे सिंचनाचा योग्य उपयोग होऊन उत्पादकता आणि गुणवत्ता वाढते. वाढत्या मजुरी खर्चावर आळा घालण्यासाठी आणि कुशल मनुष्यबळाच्या अभावी यांत्रिकीकरण ही काळाची गरज आहे.

झाडाला फळधारणा सुरू झाल्यावर वाळलेल्या फांद्यांचे प्रमाण वाढत जाते आणि त्यामुळे उत्तरोत्तर छाटणी महत्वाची होत जाते. ट्रॅक्टर आणि छाटणीयंत्राच्या सहाय्याने ६ x ६ मी. आणि ६ x ३ मी. अंतरावरच्या लागवडीची यांत्रिकीकरणाने छाटणी सहज शक्य आहे. सघन लागवडी पद्धतीमध्ये आर्थिक स्थिरता काही काळातच येते आणि जर वाळलेल्या फांद्या काढल्या गेल्या नाहीत तर आर्थिक नुकसान होऊ शकते. त्यामुळे अशा लागवड पद्धतीमध्ये छाटणी फारच महत्वाची आहे. छाटणीमध्ये वापरत्वे बदल होऊ शकतात.

एकात्मिक रोग आणि कोड नियंत्रण

पूर्वी लिंबुवर्गीय फळांमध्ये ट्रिस्टेझा विषाणू आणि डाई-बॅक हे रोग आढळून यायचे. परंतु जंभेरी आणि रंगपुर लाईम हे खुट ट्रिस्टेझा विषाणूला प्रतिरोधक असल्यामुळे त्याचा प्रादुर्भाव कमी झाला. पण हे खुट डिक्यारोगाला संवेदनशील असल्यामुळे त्याच्या एकात्मिक व्यवस्थापनासाठी पुढील उपाय सुचविलेले आहेत.


याव्यतिरिक्त रस शोषणारे पतंग, फळकिडे, खोड पोखरणारी अळी, साल खाणारी अळी इ. महत्वाच्या कीटकांचा लिंबुवर्गीय फळझाडांवर प्रादुर्भाव होतो. रसायनांचे अवशेष कमी करण्यासाठी जैविक नियंत्रण पद्धती अंगीकारणे आवश्यक आहे. त्यासाठी जैविक सापळे, योग्य कीटकनाशकांचा उपयोग, केमोस्टरीलायझेशन यासोबत एकात्मिक कीड नियंत्रण उपाय आवश्यक आहेत.

उत्तर पूर्व पर्वतीय भागामधील खोड पोखरणारी अळी आणि मध्य भारतातील साल पोखरणारी अळी तसेच पश्चिमोत्तर भारतातील सिला हा कीटक आणि भारतातील बहुतांश भागात आढळणारी फळकिड /फळमाशी, रस शोषणारी किड या देशातील लिंबुवर्गीय फळ उत्पादनासाठी मोठा धोका म्हणून समोर आल्या आहेत. एकात्मिक किड नियंत्रणासोबतच रासायनिक आणि जैविक कोड आणि रोग व्यवस्थापन पद्धती प्रभावी आणि स्थिर होण्याची गरज आहे.

वातावरणाशी समतोल राखणारे आणि प्रदेशनिहाय एकात्मिक कोड नियंत्रण पद्धती फळांवरील कीटकांच्या योग्य व्यवस्थापनासाठी अतिशय उपयुक्त ठरत आहेत. रासायनिक कीटकनाशकांच्या वाढत्या वापरामुळे उत्पादन खर्चात वाढ होत आहे. त्यामुळे कमी किमतीच्या रोग आणि कोड व्यवस्थापन पद्धती तयार करण्याची गरज आहे. सेंद्रिय शेती पद्धती कमी खर्चामुळे तसेच विषमुक्ततेमुळे लोकप्रिय होत आहेत. प्रमाणिकरणाद्वारे स्थापित होणारी संत्रा शेती येणा-या काळात देशासाठी वरदान ठरेल.

स्त्रोत – कृषी विभाग महाराष्ट्र शासन

Exit mobile version