सेंद्रीय शेती करत अडीच गुंठ्यामध्ये घेतले ३०० किलो मिरचीचे उत्पादन; वाचा तरुण शेतकऱ्याचा प्रेरणादायी प्रयोग

sachin-baikar-chilli-farming

अलिबाग : अलीकडच्या काही वर्षांमध्ये सेंद्रीय शेतीवर मोठ्याप्रमाणात चर्चा होवू लागली आहे. मात्र अद्यापही यात अपेक्षित प्रगती झाली नसली तरी अनेक शेतकरी स्वत:च नवंनवे प्रयोग करत भरघोस उत्पादन घेवू लागले आहेत. झिरोबटेज अर्थात सेंद्रीय शेती करत अलिबागच्या एका तरुण शेतकर्‍याने केवळ अडीच गुंठ्यात ३०० किलो मिरचीचे उत्पादन घेवून दाखविले आहे.

अलिबागच्या सचिन बैकर (Sachin Baikar, Alibag) या तरुण शेतकर्‍याने अडीच गुंठ्यातच त्याने मिरचीचे उत्पादन घेतले असले तरी यामध्ये रासायनिक खताचा वापर नाही तर लागवड ते काढणीपर्यंत सेंद्रीय पध्दतीचा अवलंब केला आहे. यासाठी त्याने आधी सेंद्रीय शेतीचा सखोल अभ्यास केला. कोणते पिकं घेतले तर जास्त उत्पादन घेता येवू शकते, याचा अभ्यास केल्यानंतर मिरचीची लागवड केली. मिरचीचे सेंद्रीय पध्दतीने उत्पादन घेतल्यामुळे तोडणीनंतर मिरची किमान आठ दिवस तरी सुकत नाही. आतापर्यंत सचिनने तीन वेळा काढणी केली असून ३०० किलो उत्पादन मिळाले आहे.

अशी केली सेंद्रीय खत निर्मिती

कुक्कुटपालन करताना काही पक्षी हे मरतात. हे मृत पक्षी, खराब अंडी, शेण, गोमूत्र आणि गूळ याचे मिश्रण करुन एका ड्रममध्ये साठवून ठेवले. अवघ्या काही दिवसांमध्ये सेंद्रीय खताची निर्मिती झाली. चार-पाच दिवसांच्या फरकाने मिरचीसाठी बनवलेल्या वाफ्यामध्ये पाटाच्या पाण्याद्वारे सेंद्रीय खत सोडण्यात आले.

कीडीपासून संरक्षणासाठी योग्य नियोजन

मिरचीला कीड-रोगराईचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून या क्षेत्रात झेंडूच्या फुलांची लागवड केली. त्यामुळे मिरचीवर नाही तर फुलावरच कीड बसली गेली. अशाप्रकारे कीडीपासून संरक्षण करण्यात आले.

हे देखील वाचा :

Exit mobile version