पीएम किसान योजनेचा हफ्ता जमा नसेल झाला तर, हे करा..

pm-kisan-yojana-marathi

पीएम किसान सम्मान निधि योजना ही केंद्र सरकारची एक महत्त्वाकांक्षी योजना. योजनेअंतर्गत देशातील सुमारे अकरा कोटी पात्र शेतकर्‍यांना वार्षिक सहा हजार रुपयाचा निधी दिला जातो. राज्यातील सुमारे एक कोटी पाच लाख शेतकरी या योजनेसाठी पात्रता धारक आहे. जानेवारी महिन्याच्या पहिल्या दिवशी या योजनेचा दहावा हफ्ता पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात आला. देशातील सुमारे अकरा कोटी शेतकऱ्यांना 10 व्या हप्त्याचे दोन हजार रुपये देण्यात आले. मात्र असे असले तरी, देशातील अनेक शेतकऱ्यांना या योजनेअंतर्गत अदयापही लाभ मिळाला नाही.

सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या योजनेतील अनेक पात्र शेतकऱ्यांना त्यांचे नाव आधार कार्ड वरील नावासोबत मॅच होत नसल्याने या योजनेचा निधी मिळत नाही. त्यामुळे अशा शेतकऱ्यांनी आपल्या नावात दुरुस्ती करणे अनिवार्य आहे. यासंदर्भात बिहार राज्यातील शेतकऱ्यांना नाव दुरुस्ती करण्यासाठी अवधी देण्यात आला आहे. राज्य सरकार द्वारे सांगितले गेले की, पात्र शेतकऱ्यांनी त्यांच्या नावात बदल केला तर त्यांना शिल्लक राशी देण्यात येईल.

केंद्र सरकारने 2019 मध्ये या योजनेला आधार बेस्ट करून टाकले आहे. त्यामुळे या योजनेच्या ॲप्लिकेशन मधील आणि आधार कार्ड वरील नाव मॅच होणे अनिवार्य आहे. नावात थोडीही मिस्टेक असली तरी या योजनेअंतर्गत लाभ दिला जाणार नाही. यामुळेच बिहार राज्यातील पावणे दोन लाख शेतकऱ्यांना या योजनेपासून वंचित राहावे लागले आहे. या एवढ्या पात्र शेतकऱ्यांचे आधार वरील नाव एप्लीकेशन वरील नावासोबत मॅच होत नाही.

नावात चुका असल्यामुळे अनेक शेतकऱ्यांना या योजनेपासून वंचित राहावे लागले आहे. अनेक शेतकऱ्यांना त्यांच्या बँकिंग डिटेल चुकीच्या असल्यामुळे या योजनेचा लाभ दिला जात नाही. अनेक शेतकऱ्यांनी आपल्या बँकेचा आयएफएससी कोड चुकीचा प्रविष्ट केला असल्याने त्यांना या योजनेचा लाभ दिला जात नाही. शेतकऱयांनी संबधीत बॅंकेत जाऊन चूकीची माहिती दुरुस्ती करावी त्यानंतर योजनेचा लाभ मिळण्यास सुरूवात होईल.

हे देखील वाचा :

Exit mobile version