कुक्कुटपालन व्यवसाय पुन्हा संकटात; पोल्ट्रीधारकांची ही आहे मागणी

Poultry-farming

धुळे : कोराना व बर्डफ्लूच्या संकटातून कसे बसे सावरत असतांना आता पोल्ट्रीफार्म धारकांसमोर नवे संकट उभे राहिले आहे. कोंबड्यांचे खाद्य तयार करण्यासाठी सोयापेंड, शेंगपेंड, तांदळाचा भुस्सा, मासळी आणि शिंपले यासारख्याचा वापर केला जातो. मात्र, गेल्या काही दिवसांमध्ये या खाद्यामध्ये तब्बल ६० टक्क्यांनी वाढ झालेली आहे. यामुळे सरासरी दहा हजार पक्ष्यांमागे रोज २० हजार रुपयांचा फटका शेतकर्‍यांना बसत आहे. यामुळे अंड्याचा विक्री दर वाढवावा अन्यथा अनुदान तरी द्यावे, अशी मागणी पोल्ट्रीधारकांकडून करण्यात आली आहे.

कोंबड्यांना खाद्य तयार करण्यासाठी मका २५ रुपये, सोयापेंड ६६ रुपये, शेंगपेंड ५२ रुपये, तांदूळ भुस्सा २० रुपये, मासळी ४० रुपये आणि शिंपले ६० रुपये किलो दराने मिळत आहेत. त्यात पुन्हा औषधे, जीवनसत्त्वे आणि पोषक क्षारयुक्त अन्नाचा समावेश करावा लागतो. एकूण खाद्याच्या दरात ६०-७० टक्के वाढ झाली आहे. खाद्यासाठी आवश्यक असलेले तांदूळ, गहू, सोयापेंड, मका यावर अनुदान दिले तरच त्याची खरेदी शक्य होणार आहे. याकडे सरकारने लक्ष द्यावे, अशी मागणी करण्यात येत आहे.

हे देखील वाचा :

Exit mobile version