केंद्राच्या योजनेचा राज्यातील ४१ लाख शेतकऱ्यांना फायदा, जाणून घ्या सविस्तर माहिती…

मुंबई : केंद्र सरकारच्या माध्यमातून पीकविमा योजना राबविण्यात येते. या योजनेचा आतापर्यंत तब्बल ४१ लाख शेतकर्‍यांना फायदा झाला असल्याची माहिती खुद्द राज्याचे कृषीमंत्री दादा भुसे यांनी हिवाळी अधिवेशनात एका प्रश्‍नाच्या उत्तरात दिली.
यंदाच्या वर्षात नैसर्गिक संकटामुळे शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाले आहे. मात्र, योजनेतील जनजागृतीमुळे या योजनेत शेतकर्‍यांचा सहभाग वाढत आहे.

योजनेचा लाभ अनेक शेतकर्‍यांना होत असला तरी यंदा तांत्रिक अडचणीमुळे शेतकर्‍यांच्या खात्यावर पैसे जमा होण्यास उशिर झाला होता. शेतकर्‍यांना विमा रक्कम मिळावी त्याअनुशंगाने राज्य सरकारने २ हजार ३०० कोटी रुपये विमा कंपनींना देण्यात आले होते. त्याचप्रमाणात केंद्र सरकारनेही विमा कंपन्यांना पैसे अदा केले आहेत. त्यामुळेच शेतकर्‍यांना नुकसानभरपाई ही मिळालेली आहे.

विमा कंपन्याच्या मनमानीमुळे विलंब

शेतकर्‍यांना वेळेत पैसे अदा करण्याबाबत राज्य आणि केंद्र सरकारने सुचना केल्या होत्या पण काही विमा कंपन्यांनी आडमुठी भूमिका घेतल्याने विम्याचा परतावा मिळण्यास विलंब झाला होता. दरम्यान, राज्य कृषिमंत्री तसेच कृषी आयुक्त यांनी वेळोवेळी बैठका घेऊन सुचना केल्या होत्या. वेळप्रसंगी केंद्राकडेही याबद्दल तक्रार करण्यात आली होती. त्यानंतर गेल्या १० दिवसांपासून प्रत्यक्ष नुकसानभरपाई शेतकर्‍यांच्या खात्यावर जमा होण्यास सुरवात झाली आहे.

Exit mobile version