बाजरीचे कीड व किडींपासून अशा पध्दतीने करा संरक्षण

bajari

बीड : बाजरी हे कोरडवाहू क्षेत्रासाठी एक महत्त्वाचे खरीप पीक आहे, परंतु बाजरी शेतकर्‍यांची सामान्य समस्या म्हणजे पिकांवरील कीड आणि किडींचा प्रादुर्भाव. यामुळेच कृषी तज्ज्ञ बाजरीच्या शेतकर्‍यांना कीड आणि रोगांवर नियंत्रण ठेवण्याचा सल्ला देतात. बाजरीच्या उत्तम उत्पादनासाठी शेताची चांगली तयारी, सुधारित वाणांची निवड, वेळेवर पेरणी आणि खतांचा संतुलित प्रमाणात वापर करण्याचे सूत्रही कृषी शास्त्रज्ञ शेतकर्‍यांना सांगतात.

बाजरी पिकातील स्टेम फ्लाय आणि स्टेम बोअरर किडीच्या नियंत्रणासाठी पिकांवर इमिडाक्‍लोपिड १७.८ एसएल अर्धा मिलिलिटर प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारावे. यासोबतच क्‍लोरपायरीफॉस २० ईसी किंवा फिप्रोनिल ३ टक्के ग्राम/५ टक्के एससी/३.५ टक्के एससी किंवा क्‍लोरपायरीफॉस व्हर्क यांचाही वापर करता येईल. कीटकनाशक फवारणी करताना शेतकर्‍यांनी योग्य ती काळजी घेण्याची आवश्यकता आहे.

Exit mobile version