उन्हाळी हंगामात पारंपरिक पिकांना केले दूर करत कडधान्याला प्राधान्य; वाचा शेतकऱ्यांचा नवा प्रयोग

cereals-pulses

वाशिम : दरवर्षी पाण्याची टंचाई असल्याने पारंपरिक पिकावरच शेतकर्‍यांचा भर असतो पण यंदा खरिपात झालेले नुकसान रब्बी हंगामात भरुन काढण्याासाठी वेगवेगळे प्रयोग करण्यात आले आहेत. उन्हाळी हंगामातील पेरण्या अंतिम टप्प्यात असून वाशिम जिल्ह्यातील शेतकर्‍यांनी पारंपारिक पिकांना दूर करत कडधान्यावर भर दिला आहे. हरभरा, सोयाबीन बरोबरच मुगाचे क्षेत्रही वाढले आहे.

यंदा सरासरीपेक्षा अधिकचा पाऊस झाल्याने रब्बी हंगामातील पाण्याचा प्रश्न मिटलेला आहे. शिवाय या हंगामातील सोयाबीन, हरभरा आणि मूगाला स्प्रिंकलरच्या माध्यमातून पाणी दिल्यास उत्पादनात वाढ शिवाय पाण्याची बचत असा दुहेरी उद्देश साध्य होणार आहे.

पेरणीपासून काढणीपर्यंत मूगाला ५ ते ६ वेळा पाण्याची आवश्यकता असते. वाढते ऊन आणि स्पिंकलरच्या माध्यमातून पाणी दिले तर कीड- रोगराईचा प्रादुर्भावही कमी होतो. यंदा उन्हाळी हंगामाती पिकांसाठी पोषक वातावरण असून शेतशिवारामध्ये सोयाबीन, मूग ही खरिपातील पिकेीह बहरू लागली आहेत.

हे देखील वाचा :

Exit mobile version