शेतात वाचवलं पण बाजार समितीत गमविलं

kanda-bajar-samiti

सोलापूर : यंदा निसर्गाच्या लहरीपणाचा फटका प्रत्येक हंगामात बसला आहे. कधी ढगाळ वातावरण, कधी अवकाळी पाऊस व गारपीटीमुळे शेतात पीकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अशा संकटातून पिकांना कसेबसे वाचविल्यानंतरही अनेक शेतकर्‍यांच्या प्रामुख्याने कांदा उत्पादकांच्या पदरी निराशाच पडली आहे.

गत आठवड्यात उत्तर महाराष्ट्र आणि कोकणात अवकाळीने हजेरी लावली तर पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. अशा संकटात छाटणी झालेल्या कांद्याचे नुकसान होऊ नये म्हणून रात्रीचा दिवस करुन शेतकर्‍यांनी कांदा बाजार समितीच्या आवारात आणला पण तेथेही पावसाने हजेरी लावल्याने नुकसान हे झालेच. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याची विक्री होण्यापूर्वीच पावसाने गाठले आहे. त्यामुळे नुकसान तर झालेच पण आता कांदा भिजल्याने त्याची खरेदी करण्यास व्यापारी तयार नाहीत.

हंगाम अंतिम टप्प्यात असतानाच अवकाळीची अवकृपा होत आहे. यावेळी तर तिहेरी नुकसान सुरु आहे. पावसामुळे फळबागांचे न भरुन निघणारे नुकसान झाले आहे. तर दुसरीकडे रब्बी हंगामातील ज्वारी, गहू, हरभरा यांची काढणी सुरु असतानाच अवकाळीचा कहर पाहवयास मिळत आहे. हे कमी म्हणून की काय उन्हाळी हंगामातील कांद्याची काढणीही सुरु झाली आहे. अवकाळी शेतकर्‍यांचे तीन प्रकारचे नुकसान होत आहे.

हे देखील वाचा :

Exit mobile version