भरघोस उत्पादनासाठी पेरणीपूर्वी बीजप्रक्रिया महत्वाचे का असते; जाणून घेण्यासाठी वाचा…

seed processing

पुणे : भरघोस उत्पादनासाठी पेरणीपूर्वी बियाणाचे रोग-किडीपासून संरक्षण व्हावे म्हणून औषध लावण्याच्या प्रक्रियेला बीजप्रक्रिया म्हणतात. बीजप्रक्रियेसाठी वापरण्यास दिलेली औषधे ही योग्य प्रमाणात आहेत का याची पाहणी होणे गरजेचे आहे. प्रक्रिया केलेले बियाणे हे हवाबंद डब्यात किंवा प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये ठेवणे गरजेचे आहे. शिवाय प्रक्रिया केलेले बियाणे हे सावलीतच ठेऊन वाळवून पेरावे लागतात.

अशी करावी बीजप्रक्रिया

बीजप्रक्रियेसाठी १० किलो बियाण्यास २०० ग्रॅम/ २०० मिलि जिवाणू खत हलक्या हाताने सर्व बियाण्यास सारख्या प्रमाणात लावावे. जेणेकरून बियाण्याच्या पृष्ठभागावर योग्य प्रमाणात जिवाणू खताचा थर तयार होईल. अशा प्रकारे एक किंवा एकापेक्षा अधिक जिवाणू खताचा वापर करून बियाणे सावलीत वाळवावे. भात, ज्वारी, नागली, तृणधान्ये, शेंगावर्गीय पिके, नगदी पिके, गळीत धान्ये अशा विविध पिकांसाठी ही पद्धत अत्यंत उपयुक्त आहे.

बियाणे पेरणीपूर्वी बियाण्याच्या पृष्ठभागावर जिवाणू खताची प्रक्रिया केली जाते. यामुळे बियाण्याच्या पृष्ठभागावरील सूक्ष्मजीव आपोआप जमिनीच्या संपर्कात येतात. बियाण्याची उगवण होताच सदरचे सुक्ष्मजीव मुळांच्या संपर्कात येतात येतात आणि आपले कार्य सुरु करतात. जमिनीत असलेल्या सेंद्रिय पदार्थावर जिवाणू नैसर्गिकरीत्या वाढून मुळाभोवती पृष्ठभाग व्यापून टाकतात. त्यामुळे उगवणीनंतर फुलोर्‍यापर्यंत सर्व अवस्थांमध्ये सदर उपकारक सूक्ष्मजीव मूळाभोवती कार्यरत राहून पीक पोषणासाठी उपयुक्त ठरतात.

हे देखील वाचा :

Exit mobile version