शरद पवार यांचा साखर कारखान्यांना ‘हा’ महत्वाचा सल्ला

sharad-pawar-sugar-factory

माळेगाव : भविष्यात वीज आणि इथेनॉल निर्मीत अधिक नफ्याची संधी असल्याने,  देशभरात घेतार वीज आणि इथेनाॅल निर्मितीचे प्रकल्प सुरू होत आहेत. पुढील काळातील या धंद्यातील स्पर्धा विचारात घेता माळेगावसह सर्वच साखर कारखान्यांनी उत्पादन खर्च कमी करण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे, असा सल्ला माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी शेतकऱ्यांना दिला आहे.

राज्यात अतिरिक्त ऊस गाळपाचे आवाहन, साखर विक्री, इथेनाॅल व विज निर्मीती, साखर साठ्याचे नियोजन आणि एकरी ऊस उत्पादन घटत चालल्याची कारणे विचारात घेवून शरद पवार यांनी नुकतीच माळेगाव कारखान्याला भेट दिली व संचालक मंडळाशी चर्चा केली. राष्ट्रवादीचे संभाजी होळकर त्यांच्या समवेत होते.

पवार म्हणाले, की इथेनाॅल निर्मिती करण्यासाठी सर्वत्र प्रकल्प उभारले जात आहेत. ऊस, तांदूळ, मक्यापासून इथेनाॅल निर्माण होत आहे. त्यामुळे या स्पर्धेत टिकण्यासाठी यापुढे सर्वच कारखान्यांना उत्पादन खर्च कमी करावा लागणार आहे. ११ वर्षांपुर्वमी या कारखान्यावर कोजनरेशच्या उद्धाटनाला आलो होतो, त्यावेळची आणि अत्ताची स्थिती फाराशी बदललेली नाही. खरेतर माळेगाव, सोमेश्वर आणि छत्रपती कारखान्यांच्या कार्यक्षेत्रात प्रशस्त रस्ते, साखरेसाठी वेअर हाऊस आणि एकरी उत्पादन वाढण्यासाठी जमिनी सुपिक सुधारण्यासाठी मोठी गुंतवणूक केल्याशिवाय पर्याय नसल्याचे पवार यांनी सांगितले. माळेगावने ऊस गळीतात १२ लाखाचा टप्पा ओलांडला आणि १५ लाखांपर्य़ंत गळीत करण्याचा मानस ठेवला ही गोष्ट कौतूकास्पद आहे.

दरम्यान, आपल्याकडील कारखांदारांना इथेनाॅल स्पलायसाठी जवळचे ऑइल डेपो मिळत नाहीत आणि इतर राज्यात स्पलाय कराल्यचे असल्यास वाहतूक खर्च परवडत नाही. परिणामी केंद्र सरकारच्या अपेक्षेनुसार इथेनाॅल पेट्रोलमध्ये वापरले जात नाही. त्यासाठी देशात ऊस उत्पादन न होणाऱ्या भागामध्ये इथेनाॅल पुरवठा करण्याचे काम कारखान्यांऐवजी आॅइल कंपन्यांनी केल्यास सर्व ठिकाणी इथेनाॅल पुरवठा होऊ शकतो असे तावरे यांनी सांगीतले. मदनराव देवकाते यांनी एकरी उत्पादन वाढविण्यासाठी ड्रिपचे प्रकल्प उभारणी, शेततळी, सबसरफेज ड्रेनेज होण्याकामी शासनस्तराव मदत होण्याची आपेक्षा व्यक्त केली. राजेंद्र ढवाण, सुरेश खलाटे यांनी ऊस हार्वेस्टींगमधील समस्या बोलून दाखविल्या. यावेळी एमडी राजेंद्र जगताप यांनी दोन वर्षातील गळीत हंगामाचा आढावा मांडला.

हे देखील वाचा :

Exit mobile version