‘महाराष्ट्र बैलगाडा शर्यत केसरी’ स्पर्धा सुरू करा, राष्ट्रवादीच्या ‘या’ नेत्याने केली पशुसंवर्धन मंत्र्यांकडे केली मागणी

sunil-kedar-bailgadi-sharyat

मुंबई : २०१७ साली मुंबई हायकोर्टाने बैलगाडा शर्यतींवर बंदी घातली होती. याला राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. आता, या शर्यतींना सशर्त परवानगी देण्यात आली आहे. सात वर्षांनंतर या निर्णयामुळे बैलगाडा शर्यत पुन्हा राज्यात सुरु झाल्या आहेत. याच पार्श्‍वभुमीवर राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी ‘महाराष्ट्र बैलगाडा शर्यत केसरी’ स्पर्धा सुरु करावी, अशी मागणी पशुसंवर्धन मंत्री सुनिल केदार यांच्याकडे केली आहे.

बैलगाडा शर्यत हा राज्याच्या ग्रामीण संस्कृतीचा एक अविभाज्य भाग आहे. त्यामुळे महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या धर्तीवर शासनामार्फत महाराष्ट्र केसरी बैलगाडा शर्यत आयोजित करण्याची विनंती पशुसंवर्धनमंत्री सुनिल केदार यांच्याकडे केली, अशी माहिती रोहित पवार यांनी दिली.

बैलगाडा शर्यतींना परवानगी मिळावी, यासाठी राष्ट्रवादीचे खासदार डॉ.अमोल कोल्हेंनी सातत्याने पाठपुरावा केला होता. पुणे जिल्ह्यात झालेल्या एका बैलगाडा शैर्यतीत अमोल कोल्हे यांनी स्वतः दावडी निमगावच्या घाटात घोडी धरत मतदारांना दिलेला शब्द पूर्ण केला होता. आता, बैलगाडा शर्यंतींच्या राज्यस्तरीय स्पर्धा घेण्यात याव्यात, अशी मागणी आमदार रोहित पवार यांनी केली आहे.

हे देखील वाचा :

Exit mobile version