आंतरपीक घेतांना अशी घ्या काळजी अन्यथा होवू शकते मोठे नुकसान

crope 1

पुणे : जमिनीची सुपिकता वाढविण्यासाठी तसेत कमी कालावधीत जास्तीत जास्त उत्पादन मिळवण्यासाठी आंतरपीक अर्थात मिश्रपीक पध्दतीने शेती करण्याचा सल्ला दिला जातो. याचे महत्व शेतकर्‍यांना कळाले असल्याने मिश्रपीक पध्दतीचा प्रयोग अलीकडच्या काळात वाढला आहे. मात्र यातील काही तांत्रिक ज्ञानाच्या अभावामुळेही बर्‍याच जणांची आंतरपीक (मिश्र पीक) शेती फसलेली आहेत. म्हणून आंतरपीक घेताना योग्य ती काळजी घेणे गरजेचे आहे. आज आपण उत्पन्नवाढीसाठी तंत्रशुध्द पध्दतीने आंतरपीकशेती कशी करावी, याची माहिती जाणून घेणार आहोत.

शेतात एकाचवेळी एकापेक्षा जास्त पिके लावण्याच्या पध्दतीला आंतरपिक (मिश्रपीक) पध्दत असे म्हटले जाते. सर्वसाधारणपणे या पध्दतीत एकावेळी दोन पिके लावतात परंतु काही वेळा तीन, चार अगर त्यापेक्षाही जास्त पिके घेतली जातात. शेतीच्या लहान क्षेत्रात मिश्र पिक पध्दत विशेष फायद्याची ठरते. तृणधान्ये व कडधान्याची पिके यांच्या मिश्रणामुळे जमिनीची सुपीकता वाढते. मिश्र पिके पेरण्याच्या एका पध्दतीत मुख्य पिकाच्या बियांत दुय्यम एक अथवा जास्त पिकांचे बी विशिष्ट प्रमाणात मिसळून पाभरीने ओळीत अथवा फेकून पेरतात. या पध्दतीचा वापर मर्यादित प्रमाणात केला जातो. सर्वसाधारणपणे मुख्य पिकात दुय्यम पिक स्वतंत्र ओळीत पेरतात. या पध्दतीला ‘आंतरपिक पध्दत’ असेही नाव आहे. बागायती पिकांत मुख्य पिकाच्या पाण्याच्या पाटाच्या बाजूला अथवा वाफ्यात ठराविक अंतरावर दुय्यम पिकांची लागण करतात.

महाराष्ट्रातील अनेक भागात कापूस व तूर हे मिश्र पीक घेण्याची पध्दत आहे. कापूस व बाजरी लवकर तयार होत असल्याने ती काढून घेतल्यावर तुरीच्या झाडांना त्यांचा विस्तार करण्यास भरपूर जागा मिळते. तुरीच्या झाडांच्या मुळ्यांवरील नायट्रोजनयुक्त गाठींमुळे जमिनीला नायट्रोजनचा पुरवठा होतो व जमीन सुधारते. ज्वारीच्या पिकात उडीद पेरतात, त्यात दोन उद्देश साध्य होतात. उडदाच्या पिकामुळे जमीन सुधारते व ज्वारीपेक्षा ते पिक लवकर तयार होते.

मुख्य पिकांतील आंतरपिके
कापसाच्या दोन ओळींच्या मधोमध मूग, उडीद किंवा सोयाबीन या आंतरपिकाची एक ओळ म्हणजे कापूस + मूग (१: कापूस + उडीद (१: किंवा कापूस + सोयाबीन (१: अशा पध्दतीने घेतात.
तूर + मका ह्या आंतरपीक पध्दतीवर आधारित अन्नद्रव्य व्यवस्थापनासह घेतलेल्या संशोधन प्रयोगांमध्ये तूर + मका (४: याप्रमाणात पेरणी केल्यास निव्वळ आर्थिक मिळकत अधिक मिळाल्याचे आढळून आले आहे.
भुईमूगाच्या पिकात आंतरपीक घ्यावयाचे झाल्यास, भुईमूग + सूर्यफुल (६: भुईमुग + तूर (६: भुईमूग + ज्वारी (६: भुईमूग + कापूस (६: ओळींच्या प्रमाणात घ्यावे. सूर्यफुलात तुरीचे आंतरपिक २: या प्रमाणात घेणे अधिक फायदेशीर आढळून आले आहे. तसेच तीळामध्ये आंतरपिक घ्यावयाचे झाल्यास तीळ + मूग (३: तीळ + सोयाबीन (२: तीळ + कपाशी (३: ओळीप्रमाणे घेतल्यास अधिक आर्थिक उत्पन्न मिळते.
रब्बी हंगामातील पिकांच्या बाबतीत आंतरपिकासाठी गहू या पिकात मोहरीचे आंतरपिक ९: ओळींप्रमाणे घ्यावे. करडी या पिकात हरभरा व जवस या आंतरपिकाची योजना ३: ओळींच्या प्रमाणात करता येते. जवस या पिकात हरभरा व करडीचे आंतरपिक ४: ओळींप्रमाणे घेता येते. जवस + मोहरी ५: ओळींच्या प्रमाणानुसार आंतरपीक पध्दतीसुध्दा फायद्याची आढळून आली आहे.

Exit mobile version