शेतकर्‍यांना सतावतेय जनावरांच्या चार्‍याची चिंता; ज्वारीपेक्षा कडब्याचा दर जास्त

jwari kadba

औरंगाबाद : रब्बी हंगामात यंदा पीक पध्दतीमधील बदलाचे परिणाम थेट ज्वारीच्या दरावर आणि जनावरांसाठी आवश्यक असलेल्या कडबा दरावर देखील पाहवयास मिळणार आहे. सध्या ज्वारीपेक्षा अधिकचा दर हा कडब्याला आहे. ज्वारी ही २ हजार क्विंटल तर कडब्याला २ हजार ५०० रुपये शेकडा असा दर आहे.

खरिपात कापूस आणि रब्बी हंगामात ज्वारी हे मराठवाड्यातील मुख्य पीक होते. मात्र, आता ज्वारीची जागा हरभर्‍याने घेतली आहे तर खरिपात सोयाबीनच्या क्षेत्रात मोठी वाढ झाली आहे. ज्वारी पेरणीपासून ते काढणीपर्यंत अथक परिश्रम आणि उत्पन्न कमी ही अवस्था आहे. ज्वारीला पाणी, मशागत, काढणी, मोडणी आणि त्यानंतर मळणी करावी लागते. त्यांनतर पुन्हा कडबा गोळा करुन त्याची गंज लावावी लागते.

उन्हाळी हंगामात ज्वारीची काढणी झाली की पावसाळ्यापर्यंत कडबा हाच जनावरांसाठी चारा असतो. हीच परंपरा गेल्या अनेक वर्षापासून सुरु आहे. पण आता ज्वारीचे क्षेत्र घटल्याने कडब्याला अधिकचे महत्व आले आहे. सध्या ज्वारीपेक्षा कडब्याला अधिकची मागणी आहे. कडब्याची एक पेंढी २० ते २५ रुपयांना विकली जात आहे. तर दुसरीकडे ज्वारी ही २० रुपये किलोने विक्री होत आहे. यामुळे शेतकर्‍यांना कडब्याची चिंता सतावत आहे.

हे पण वाचा :

Exit mobile version