उन्हाच्या तडाख्यात ‘या’ हंगामी पिकांनी केलं शेतकर्‍यांना मालामाल

farmer-

प्रतीकात्मक फोटो

नाशिक : कमी कालावधीत अधिकचे उत्पन्न यासाठी हंगामी पिकांना शेतकर्‍यांची पसंती असते मात्र यासाठी मुबलक पाण्याची आवश्यकता असते. यंदा राज्यभरात सर्वत्र सरासरीपेक्षा अधिकचा पाऊस झाल्याने भर उन्हाळ्यातही पाणीटंचाईच्या झळा जाणवल्या नाहीत. त्यामुळे शेतकर्‍यांनी यंदा कलिंगड, काकडी अशा हंगामी पिकांची लागवड केली होती. शिवाय निंबूच्या बागाही यंदा चांगल्याच बहरल्या. कलिंगड, काकडी व निंबू या तिन्ही पिकांना बाजारात मागणीही जास्त आहे आणि त्यासाठी भाव देखील चांगला मिळत असल्याने शेतकर्‍यांना चांगलाच आर्थिक फायदा होत आहे.

काकडीला मोठी मागणी
नैसर्गिक गारवा असलेली काकडीही यंदा भाव खात आहे. सध्या १ किलो काकडीसाठी ५० रुपये ग्राहकांना मोजावे लागत आहेत. यातच शेतकरी व्यापार्‍यांना काकडी देण्याऐवजी स्वत:च विकत आहे. यामुळे शेतकर्‍यांच्या पदरी दोन पैसे जास्तच पडत आहेत. दोन महिन्यात उत्पादन होणारे काकडीचे पीक आता काढणीला आलय, त्यातच तापमान ४२ अंशाच्या आसपास गेल्याने नैसर्गिक गारवा देणार्‍या काकडीची मोठी मागणी वाढली आहे.

टरबूज विक्रीचे गणित शेतकर्‍यांना समजले
टरबूज हे हंगामी पीक असल्याने दरवर्षी त्याला भरपूर मागणी असते. सध्या टरबुज १५ ते २० रुपये किलोने विकला जात आहे. टरबूजाची मागणी दरवर्षी सारखीच राहते. यंदाही अशीच मागणी अपेक्षित आहे. दरवर्षी शेतकर्‍यांचे उत्पादन तर वाढत आहे पण योग्य दर मिळत नसल्याने उत्पन्नात भर पडत नाही. उलट जे व्यापारी, मध्यस्ती आहेत ते अधिकचा फायदा घेतात. इतर शेतीमाल शेतकर्‍यांना स्वत:हून विक्री करता येत नसला तरी हंगामी पिकांची विक्री करता येते म्हणूनच कलिंगडाची विक्री शेतकरीच करताना दिसत आहेत.

निंबू भाव खातोय
गेल्या काही दिवसांमध्ये उन्हात प्रचंड वाढ झाली आहे. शीतपेयासाठी लिंबाचा वापर वाढत आहे. अनेक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये निंबूला चांगला दर मिळत आहे. काही दिवसांपूर्वी सोलापूरला निबूला २५० रुपये किलो असा दर मिळाला होता. असेच ऊन वाढत गेले तर मागणीत वाढ आणि पुरवठ्यात कमी अशी स्थिती ओढावणार आहे. त्यामुळे भविष्यात लिंबाच्या दरात वाढ होणार असल्याचा अंदाज व्यापारी व्यक्त करीत आहे.

हे देखील वाचा :

Exit mobile version